![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jalgaon News : आर एल ज्वेलर्सवर धाड, तब्बल साठ अधिकारी, 45 तास तपासणी, 87 लाखांची रक्कम जप्त, काय आहे नेमकं प्रकरण?
Jalgaon R L Jwellers : राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या इतिहासात पहिल्यांदा ईडीच्या कारवाईमुळे कोट्यवधी रुपयांचे सोने आणि लाखो रुपयांची रोकड जप्त झाली.
![Jalgaon News : आर एल ज्वेलर्सवर धाड, तब्बल साठ अधिकारी, 45 तास तपासणी, 87 लाखांची रक्कम जप्त, काय आहे नेमकं प्रकरण? jalgaon latest news ED raid on Jalgaon Rajmal Lakhichand Jewelers in Jalgaon city maharashtra news Jalgaon News : आर एल ज्वेलर्सवर धाड, तब्बल साठ अधिकारी, 45 तास तपासणी, 87 लाखांची रक्कम जप्त, काय आहे नेमकं प्रकरण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/cca925f18bcbb03b5a7cf237128dec161692448744054738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : जळगाव शहरातील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर गुरुवारी ईडीने छापेमारी केली. यानंतर जवळपास साठ अधिकाऱ्यांनी 45 तास चौकशीसह तपासणी करून 87 लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने सील केले. यामुळे राजमल लखीचंद ज्वेलर्सला चांगलाच फटका बसला असून ईडीने कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे सोने आणि लाखो रुपयांची रोकड ताब्यात घेतल्याची कारवाई केल्याने खळबळ उडाली.
जळगावच्या (Jalgaon Crime) आरएल ग्रुपवर ईडीने (ED) छापेमारी करत लाखो रुपयांची रोकडसह कोट्यवधी रुपयांचे सोने ताब्यात घेतल्याची कारवाई केल्याने खळबळ उडाली. आर. एल. समूहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी बँकेने आणि आर. एल. समूहाने परस्परविरोधी दावे केल्याने वाद सुरु आहे. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँकेने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे. गुरुवारी सक्त वसुली संचालनालयाच्या सुमारे 25 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. गुरुवारी पहाटेपर्यंत तपासणी केल्यावर ईडी पथकाने आर एल ज्वेलर्सच्या (Rajmal Lakhichand) शोरुममधील 87 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली, तसेच शोरुममधील सोन्याचा स्टॉक सील केला.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)