एक्स्प्लोर

jalgaon : उष्णतेच्या लाटेने मयत झालेल्या वीस लोकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; जळगावातील जीएम फाऊंडेशनचा पुढाकार

Jalgaon Heat Wave : एकूण 50 लोकांचा उष्णतेच्या लाटेने मृत्यू झाला होता, त्यापैकी 20 मृतदेहांची ओळख पटत नव्हती. त्यामुळे या सर्व मृतदेहांवर एकाच वेळी अत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जळगाव : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत पावलेल्या 20 लोकांवर एकाच वेळी अत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जी एम फाऊंडेशनच्या वतीने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. उष्णतेच्या लाटेने (Jalgaon Heat Wave) या सर्वांचा मृत्यू झाला होता. 

जळगाव जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला राहून उदरनिर्वाह करणाऱ्या पन्नासहून अधिक लोकांचा गेल्या आठ दिवसात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उष्णतेच्या लाटेने या सर्वांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी 30 जणांची ओळख पटली होती, पण इतर 20 मृतदेहांची ओळख मात्र पटली नव्हती. त्यांच्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली

वाढत्या उष्णेतेच्या लाटेचा परिणाम म्हणून रस्त्याच्या कडेला राहून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या 50 अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. हे सर्व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते.

यातील तीस जणांची ओळख पटली असली तरी वीस जणांची ओळख पटली नव्हती. ही मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने अशा मृतदेहांवर तातडीने अंत्य संस्कार होणे गरजचे होते. मात्र यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचं लक्षात येताच मंत्री गिरीश महाजन यांच्या जी एम फाऊंडेशन या संस्थेने पुढाकार घेत दहा मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत.

हे अंत्य संस्कार करण्यापूर्वी शहरातील नेरी नाका स्मशानभूमी परिसरात हे मृत देह पुरण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न केले होते. मात्र त्याला स्थानिक लोकांनी विरोध केल्याने एकाच वेळी एवढ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे मोठं आव्हान होतं. त्यामुळे रविवारी दहा मृतदेहावर तर सोमवारी दहा मृतदेहांवर जी एम फाऊंडेशनच्या वतीने अंत्य संस्कार करण्यात येत आहेत.

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत झालेले हे लोक विविध आजाराने ग्रस्त होते. त्यातच उन्हाचा फटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. यासर्व मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेले आणि रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यानं या सर्व व्यक्तींचा उन्हाच्या तीव्रतेनं मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. त्यानंतर आता ज्यांची ओळख पटली नाही त्या सर्व म्हणजे 20 मृतदेहांवर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pankaja Munde Meet Sachin Family : भावनिक होऊन टोकाचं पाऊल उचलू नका, पंकजा मुडेंचं आवाहनCity 60 Super Fast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines  17 June 2024Mallikarjun Kharge On Wayanad Lok Sabha : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार- खर्गे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
Embed widget