एक्स्प्लोर

Jalgaon Family died due to Shock: शेताच्या कुंपणातील करंट लागून पाच जणांचं कुटुंब मृत्यूमुखी पडलं, दोन वर्षांची दुर्गा वाचली, मृतदेहांच्या बाजूला बसून रडत राहिली

Jalgaon News : मोठी बातमी : शेतातील कुंपणाच्या तारेला वीजेचा करंट, लेकरा-बाळासंह मजूर चिटकले, 5 जणांचा जागेवर मृत्यू. पहाटे शॉक लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली.

Jalgaon Family died due to Shock: जळगावच्या एरंडोल तालुक्यात बुधवारी पहाटे शेतामधील कुंपणात सोडण्यात आलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली होती. एरंडोल तालुक्यातील वारखेडी (Jalgaon News) गावात एका शेताभोवती तारेचे कुंपण घातले होते. शेतात कोणी शिरु नये म्हणून मालकाने या कुंपणात वीजेचा (Electric Fence in Farm) प्रवाह सोडला होता. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिला, पुरुष आणि लहान मुलांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये विकास रामलाल पावरा (वय 35), त्यांची पत्नी सुमन पावरा (वय 30), मुलगा पवन (वय 4), मुलगा कवल (वय 3), विकास यांची सासू यांचा समावेश आहे. मात्र, या भयानक दुर्घटनेतून दोन वर्षांचा चिमुरडी आश्चर्यकारकरित्या बचावल्याची माहिती समोर आली आहे.

या लहान मुलीचे नाव दुर्गा पावरा असे आहे. तिचे संपूर्ण कुटुंब कुंपणाला स्पर्श केल्यानंतर शॉक लागून मृत्युमुखी पडले होते. मात्र, दोन वर्षांची ही चिमुरडी आश्चर्यकारकरित्या बचावली आहे.  पोलीस (Jalgaon police) याठिकाणी आले तेव्हा घटनास्थळी कुटुंबीयांच्या मृतदेहाजवळ दुर्गा एकटी बसली होती. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. पोलीस कर्मचारी मधुरा पवार यांनी दुर्गाला जवळ घेत तिला मायेची उब देण्याचा प्रयत्न केला होता. दुर्गाला आता तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Jalgaon News: रानडुक्करांपासून मका वाचवण्यासाठी शेतात करंट सोडला अन् पाच जणांचा मृत्यू

वारखेडी गावातील बंडू पाटील यांनी शेतातील मका रानडुक्करांपासून वाचवण्यासाठी शेतीला घातलेल्या तारेच्या कुंपणात करंट सोडला होता. विकास पावरा या मजुराचे कुटुंब याठिकाणी आले तेव्हा त्यांना याची कल्पना नव्हती. हे सगळे शेताच्या बाजूने असलेल्या पायवाटने जात असताना त्यांचा तारेच्या कुंपणाला स्पर्श होताच पाच जणांचा मृत्यू झाला. बराच वेळ या गोष्टीचा कोणाला पत्ता नव्हता. शेतमालक बंडू पाटील सकाळी शेतात गेले तेव्हा कुटुंबीयांच्या दोन वर्षांची दुर्गा कुटुंबीयांच्या मृतदेहापाशी बसून रडतानाचे हृदयद्रावक दृश्य त्यांना दिसले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा

भांडूपमध्ये रस्त्यात करंट पसरला, लोकांनी हाका मारल्या पण मुलाच्या कानात हेडफोन, वीजेचा झटका बसून मुलाचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट
एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट
अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका
अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका
Jalgaon Vidhan Parishad Election 2026: जळगावात भाजपमध्ये अंतर्गत कलह; नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीवरून गिरीश महाजन अन् रक्षा खडसे यांच्यात जुंपली, नेमकं काय घडलं?
जळगावात भाजपमध्ये अंतर्गत कलह; नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीवरून गिरीश महाजन अन् रक्षा खडसे यांच्यात जुंपली, नेमकं काय घडलं?
जळगाव विधान परिषद निवडणूक : महायुतीमधील बंडखोरीचा तिढा सुटला, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेशमा काळेंची माघार
जळगाव विधान परिषद निवडणूक : महायुतीमधील बंडखोरीचा तिढा सुटला, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेशमा काळेंची माघार

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा!
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
Smriti Mandhana: स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
NEET Exam:दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली; दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
Embed widget