Jalgaon Crime News : जुन्या वादाच कारणं ठरलं अन तरुणाचं आयुष्यच संपलं, जळगावातील घटनेने खळबळ
Jalgaon Crime News : जळगाव शहरातील समता नगर येथे दोन तरुणांच्या वादामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं.
जळगाव : जळगाव (Jalgoan) शहरातील समता नगर येथे रविवार 10 डिसेंबर रोजी दुपारी जुन्या वादातून तरुणाचा चॉपरने वार करून निर्घृण खून केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. तसेच यामध्ये सोबत असणारे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. अजय बळीराम सोनवणे वय 28 असं या मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर सोबत त्याचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे आणि आशिष संजय सोनवणे हे दोघेजण गंभीर जखमी झालेत.
जळगाव शहरातील समता नगर परिसरात जुन्या वादातून रविवार 11 डिसेंबर रोजी सकाळी काही तरुणांसोबत मयत अरुण याच्यासोबत वाद झाला होता. त्यावेळी हा वाद काही लोकांच्या मदतीने मिटवण्यात आला. पण दुपारी 3 वाजताच्या दरम्यान हा वाद पुन्हा उफाळून आला. तेव्हा काही मारेकऱ्यांनी मयत अरुण बळीराम सोनवणे याला समता नगरातील वंजारी टेकडी येथे एकट्याला बोलवले. दरम्यान अरुण सोनवणे हा टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ गोकुळ सोनवणे हा देखील तिथे धावत गेला.
पण भाऊ पोहचेपर्यंत बराच उशीर झाला होता. कारण तोपर्यंत इतर इतर मारेकऱ्यांनी त्याच्यावर अजयवर चॉपर आणि कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये अरुण सोनवणे यांच्या गळ्यावर, छातीवर पाठीवर, मानेवर वार करण्यात आले. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच सोबत असलेले आशिष संजय सोनवणे आणि गोकुळ बळीराम सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पण तेव्हा अजयचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी अजयच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.
जेव्हा अजयला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी देखील पाहायला मिळाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समतानगर आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सध्या तरी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.