एक्स्प्लोर

Jalgaon News: बापलेकाचा प्रवास ठरला शेवटचा, जळगावमध्ये पिता पुत्रावर मधमाशांच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू

Jalgaon News: दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या पिता-पुत्रांवर मधुमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला.

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) पाचोरा तालुक्यातील (Pachola Taluka) नगरदेवळा येथील पिता पुत्रावर मधमाशांनी हल्ला (Honey Bee) केल्याची घटना घडली आहे. यात पित्याचा मृत्यू झाला असून जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सब्दर सैयद इस्माइल सैय्यद असे मयताचे नाव असून  त्यांचा मुलगा आबिद सब्दर सैय्यद हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली होती. ते वृक्षारोपण करत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला होता. या घटनेत सयाजी शिंदे सुखरूप होते. आता एक दुसरी घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. पिता पुत्रावर मधमाशांनी हल्ला केला. यात वडिलांचा मृत्यू झाला आहे. 

सब्दर सैयद इस्माइल सैय्यद व त्यांचा मुलगा आबिद सब्दर सैय्यद कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आज रोजी बनोटी शिंदोळ मार्गाने दुपारच्या दरम्यान नगरदेवळा येत होते. अचानक शिंदोळ रस्त्यावर दुचाळीवरून जात असताना झाडावर बसलेल्या मधमश्या अचानक उठल्या. या मधमाशांनी या ठिकाणाहून जात असलेल्या सब्दर ईकबाल सैय्यद व आबिद सब्दर सैय्यद यांच्यावर हल्ला केला. यात सब्दर ईकबाल सैय्यद यांचा जागीच मृत्यू झाला. तर, आबिद सब्दर सैय्यद याला जळगाव येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

पुणे बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरु  असल्यामुळे तेथील झाडे वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे सदर ठिकाणी गेले होते.  यावेळी मधमाशांनी सयाजी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं. झाडांचं पुनर्रोपण करत असतांना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. 

सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड

अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड केली आहे. सयाजी शिंदे हे लोकांना झाडे लावण्याचा संदेश देतात. अभिनेते सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी काही वर्षांपूर्वी एका उपक्रमाची घोषणा केली होती. राज्यभरातील जी काही खुप जुनी झाडे आहेत, त्यांची माहिती एकत्र करण्यासाठी सह्याद्री देवराईकडून दोन मोबाईल नंबर देण्यात आले.  त्या नंबरवर आपला जुन्या झाडासोबतचा झाडाला मिठी मारलेला फोटो आणि ते झाड किती वर्षे जुनं आहे, ते कुठे आहे, ही माहिती लिहून व्हॉट्सॲप करायची होती. त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget