एक्स्प्लोर

'काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढणार'; अनिल देशमुखांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर!

Devendra Fadnavis on Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.

Devendra Fadnavis जळगाव : पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना एकवर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात जावे लागले. तसेच अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कठोर कारवाई केली होती. काही महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला. यावर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला. आपल्याला कोणत्या परिस्थितीत जावं लागलं, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता, असा मोठा असे त्यांनी म्हटले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते सर्व कल्पित गोष्टी बोलत आहेत. बरंच सत्य हे माझ्याजवळ आहे. योग्य वेळी मी ते बाहेर काढेल. आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सणसणी पसरवायची आहे. मात्र ज्यावेळेस मी सत्य बाहेर काढेल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे याच्यावर जास्त काही मी बोलत नाही. 

काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढेलच

खरं म्हणजे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे. त्या घटनेमध्ये हे सरकारमध्ये होते. त्यांचं सरकार त्या ठिकाणी होतं. त्यांच्याच काळात सगळा तो फॉर्मचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला. त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले? या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढेलच, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.  

ठाकरेंना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता

शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काल सुद्धा बोललो की मोदीजी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करू शकत नाही. त्यांनी वारंवार सांगितलं की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत. पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल गेला आहे. त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे. त्यांना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ञांकडे नेलं पाहिजे, असे टीका त्यांनी यावेळी केली. 

भुजबळ साहेब कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत

आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप केला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  भुजबळ साहेब कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत. भुजबळ साहेब पूर्ण ताकदीने आणि शक्तीने महायुतीच्या पाठीशी आहेत. ते महायुतीचाच प्रचार करतील अर्थात भुजबळ साहेबांमध्ये आणि सुहास कांदे यांच्यात काही डिफरन्स आहेत ते आम्ही दूर करू, असं त्यांनी म्हटलंय.

आणखी वाचा

Amit Shah: भाजप जिंकल्यास मुस्लिमांचं आरक्षण रद्द करुन ते SC, ST आणि ओबीसींना देऊ; अमित शाहांचं महत्त्वाचं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget