एक्स्प्लोर

मंदीचं सावट, जळगावमधील 60 चटई उद्योग बंद, कोट्यवधींचा फटका, हजारो कामगार बेरोजगार

Global Recession In 2023: मागील काही दिवसांपासून जगभरात आर्थिक मंदी येणार असल्याच्या चर्चा, दावे होत आहेत.

Global Recession In 2023: मागील काही दिवसांपासून जगभरात आर्थिक मंदी येणार असल्याच्या चर्चा, दावे होत आहेत. अनेक ठिकाणी तर कर्मचाऱ्यांची कपात केल्याचेही समोर आले. 2023 मध्ये आर्थिक मंदी आल्यास जगावर मोठं संकट उभं राहू शकते. जगभरातील आर्थिक मंदीच्या सावटाचा परिणाम जळगावमधील चटई उद्योगावरही पडला आहे. जळगावमधील 60 चटई उद्योग बंद पडले आहेत. काही चटई उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. 

केळी, कापूस, सोने, डाळ उद्योगासह चटई उद्योगासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर रशिया युक्रेन युद्ध,आणि कोरोनाचं जगावर येऊ पाहत असलेल सावट याचा एकत्रित परिणाम पाहाता जगावर आर्थिक मंदीचं सावट आलं आहे. त्यामुळं जगभरात दोनशे कोटी रुपयांची आणि देशांतर भागात होणारी चटईच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळेच जळगाव शहरातील दीडशे पैकी साठ उद्योग बंद पडले आहेत. तर आणखी काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जळगावमधून युरोप ,दक्षिण आफ्रिकासह अरब आणि आशिया खंडात अनेक देशात चटई निर्यात केली जाते.  मात्र मंदीचे सावट पाहता अनेक देशांनी तूर्तास चटई खरेदीचे प्रमाण अतिशय कमी केले आहे. त्यामुळे उत्पादन आणि निर्यात करणे अनेक चटई उद्योगांना परवडत नाही. त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले असल्याचं चटई उद्योजकांचे म्हणणं आहे. जागतिक पातळीवर तर अडचणी येत असताना स्थानिक पातळीवरही अनेक अडचणींचा सामना चटई उद्योजकांना करावा लागत आहे. वीज आणि कच्च्या मालाचे वाढते दरांमुळेही अनेक उद्योग बंद झाले आहेत.  बंद पडलेले उद्योग वाचवण्यासाठी सरकारने मदतीचा हात द्यायला हवा, अशी मागणी जळगावातील चटई उद्योजकांनी केली आहे. 

IMF आणि जागतिक बँकेकडून आर्थिक मंदीचा इशारा 
पुढील वर्षी जगभरात आर्थिक मंदी येऊ शकते, आसा इशारा सप्टेंबरमध्ये जागतिक बँकेने आपल्या अहवालात दिला होता. जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले होते की, जागतिक मंदीची काही चिन्हे आधीच प्राप्त होत आहेत. 1970 च्या मंदीनंतर सर्वात मोठ्या घसरणीला पोहोचली असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आले. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून आर्थिक धोरण कडक केल्यामुळे महागाई नियंत्रित करण्यासाठी उत्पादन वाढवणे आणि पुरवठ्यातील अडथळे दूर करणे आवश्यक असल्याचेही जागतिक बँकेनं सांगितलं. आयएमएच्या ऑक्टोबरमधील अहवालानुसार, 2023 मध्ये जागितक अर्थव्यवस्था एक तृतीअंशपेक्षा जास्त प्रमाणात ढासळू शकते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Embed widget