एक्स्प्लोर

विदर्भात बीटी कपाशीवर बोंडअळींचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

विदर्भात शेतकऱ्यांसाठी कापूस म्हणजे पांढरं सोनं मानलं जातं. मात्र तेच सोनं आता मातीमोलाचे ठरले आहे. या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे रिपोर्ट जरी कृषी खात्याने मागवले असले, तरी गेल्या 5 वर्षात वापरात सुरु झालेली बीटी 2 टेक्नॉलॉजी ही नक्कीच यावेळी तरी अनुत्तीर्ण झाली आहे.

नागपूर : विदर्भात गुलाबी बोंडअळीनं कापसावर हल्ला चढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पहिली पसंती असलेलं बीटी वाण बोंडअळ्यांच्या भक्ष्यस्थानी सापडलं आहे. हातातोंडाशी आलेल्या कपाशीवर बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यानं विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे वर्धा जिल्ह्यातील प्रशांत साहू यांचं 12 एकरावरील कापसाचं पीक उद्ध्वस्त झालं आहे. हताश झालेल्या साहूंनी आपल्या शेतात जनावरांना सोडलं आहे. हाताशी आलेलं पीक बोंडअळीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हताश झालेल्या साहूंनी आपलं कापसाचं पीक शेतकऱ्यांना किमान चारा मिळावा म्हणून जनावरांच्या हवाली केलं आहे. अकोला जिल्ह्यातील गजानन बोंडेंची समस्याही काही वेगळी नाही.  गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावानं गजानन बोंडेंनी आपल्या 7 एकरातील कपाशीवर नांगर फिरवला आहे. बोंडेंनी आपल्या कपाशीवर आतापर्यंत जवळपास अडीच लाख रुपये खर्च केले होते. मात्र बोंडअळीमुळे हातातोंडाशी आलेल्या पीकावर त्यांना पाणी सोडावं लागलं आहे. अंगावर असलेलं पाच लाखांचं कर्ज कसं फेडावं हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. हेच चित्र विदर्भात सगळीकडेच पाहायला मिळतं आहे. काय आहे आकडेवारी ?
  1. महाराष्ट्रातील कापूस लागवड -64 लाख हेक्टरपेक्षा जास्त
  2. सरासरीच्या112 टक्के
  3. गुलाबी बोण्डअळीआक्रमण - शासकीय आकडे उपलब्ध नाहीत
  4. शासनाच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन - 90% कापसावर प्रादुर्भाव
  जवळपास 15 वर्षांपूर्वी आलेल्या बीटी कपाशीमुळे शेतकऱ्यांना चांगलं पीक मिळत होतं. मात्र आता 2009 पासून बीटीच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरु झाल्या. विदर्भात शेतकऱ्यांसाठी कापूस म्हणजे पांढरं सोनं मानलं जातं. मात्र तेच सोनं आता मातीमोलाचे ठरले आहे. या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे रिपोर्ट जरी कृषी खात्याने मागवले असले, तरी गेल्या 5 वर्षात वापरात सुरु झालेली बीटी 2 टेक्नॉलॉजी ही नक्कीच यावेळी तरी अनुत्तीर्ण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget