एक्स्प्लोर

Indurikar Maharaj Daughter Marriage: पैसा कुठून आला ते मुलाची भेट...इंदुरीकर महाराजांचं लग्नातल्या टीकेला थेट उत्तर, मनातलं सगळं बोलले!

Indurikar Maharaj Daughter Marriage: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा 3 मे रोजी विवाह संपन्न झाला.

Indurikar Maharaj Daughter Marriage: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा 3 मे रोजी विवाह संपन्न झाला. ज्ञानेश्वरी हिचा विवाह उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल (Indurikar Maharaj Daughter Marriage) यांच्याशी झाला. या शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. दरम्यान, ज्यावेळी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा झाला होता, त्यावेळी इंदोरीकर महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. आता मुलीचा विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी लग्नात भाषण करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. (Indurikar Maharaj Daughter Marriage)

मुलीच्या जशी साखरपुड्याची चर्चा काही काळ चालली, तशीच या विवाहाची चर्चा आता दीर्घकाळ चालेल. ज्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, त्यांनी आपल्या मुलांच्या विवाहात आनंदाने खर्च करावा, अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराजांनी दिली. पाहुण्यांसाठी पारंपरिक, सात्विक जेवणाची (गुलाबजाम आणि मट्ठा यांसारख्या काही मिठाईंशिवाय) व्यवस्था केली होती, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले. (Indurikar Maharaj Daughter Marriage)

माझ्या भक्तमंडळाने 90 टक्के खर्च केला- इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj Daughter Marriage)

लग्नात मी मठ्ठा , गुलाबजाम केले नाही. लग्नामध्ये मराठमोळं आणि सात्विक जेवन होतं. आज मुलगा, मुलगी मोठी झाले ते दिसत आहे. मी किर्तनासाठी फिरत असल्याने त्यांची भेट होत नव्हती, माझी आणि माझ्या मुलाची देखील तीन वर्षे झाले भेट नाही. मी विद्यालय चालवतो, एक रुपया घेत नाही. शाळेत 13 शिक्षक आहेत, लग्नानंतर आता प्रश्न विचारला जाईल एवढा पैसा कुठून आला? माझ्या भक्तमंडळाने 90 टक्के खर्च केला. देणाऱ्याने दिला, त्यामुळे ट्रोल करण्याचा कोणाला अधिकार नाही, असं इंदुरीकर महाराजांनी सांगितले.

नकारात्मकतेपेक्षा चांगल्या गोष्टीवर लक्ष घ्यावं- इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj Daughter Marriage)

एक हटयुग आणि ज्ञानयोग...असे दोन योग...नास्तिक लोक त्यांचा मुळ स्वभाव सोडत नाही. आनंदाने, सामुहिकतेने आणि सात्विक विचारांनी झालेला हा विवाह आहे.टीका करणाऱ्यांनी नकारात्मकतेपेक्षा चांगल्या गोष्टीवर लक्ष घ्यावं, असं इंदुरीकर महाराज म्हणाले. 

लेकीच्या लग्न खर्चांवरुन ट्रोलर्सना सुनावलं, इंदुरीकरांचं भर लग्नातलं भाषण, VIDEO:

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...
उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget