Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्थेत येणार तेजी, कोरोनाची अनिश्चितता कमी झाल्याने मागणी वाढेल
Indian Economy Update: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला आता गती मिळणार आहे.
Indian Economy Update: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला आता गती मिळणार आहे. नुकताच केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या ( Finance Ministry) आर्थिक व्यवहार विभागाने ( Improvement in Demand) आपला मासिक आर्थिक अहवाल जारी केला आहे. ज्यामध्ये कोरोना महामारीमुळे चिंता आणि अनिश्चितता कमी झाल्यास देशात खाजगी क्षेत्राकडून ( Private SEctor) मागणीत सुधारणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत तेजी येणार असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक (Monthly Economic Report) अहवालानुसार, 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात ( General Budget) सरकारने केलेल्या घोषणांच्या आधारे, भारतीय अर्थव्यवस्था प्रमुख देशांच्या तुलनेत सर्वात वेगवान वाढेल. या अहवालात सांगण्यात आले आहे की, "पीएलआय योजना आणि पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक भांडवल गुंतवणुकीमुळे उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या या अहवालात असे सांगण्यात आहे की, प्रधानमंत्री किसान योजना (पीएम किसान सन्मान निधी योजना) द्वारे किमान आधारभूत किंमत आणि उत्पन्न हस्तांतरणामुळे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृद्धी होईल. अहवालात म्हटले आहे की, भारत हा एकमेव मोठा आणि प्रमुख देश आहे, ज्याचा आयएमएफ (IMF) ने 2022-23 साठी विकास दराचा अंदाज वाढवला आहे. महत्त्वाचे म्हणजे आयएमएफने 2022 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत घट होणार असल्याचे सांगितले आहे.
या अहवालानुसार, भारतीय लोकांच्या धोरणात्मक दूरदृष्टीमुळे 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगातील प्रमुख देशांमध्ये सर्वात वेगाने वाढेल, असा अंदाज आहे. तसेच 2020-21 भारतीय अर्थव्यवस्था 6.6 टक्क्यांनी घासली होती, असं ही या अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाने मागील अर्थसंकल्पात निर्धारित केलेली दिशा मजबूत केली आहे.
हेही वाचा :
- Amit Shah : दिल्ली पोलिसांनी अनेक दहशतवादी घटना हाणून पाडल्या, गृहमंत्री अमित शाह यांनी केल कौतुक
NSA Ajit Doval : मोठे षड्यंत्र? NSA अजित डोवाल यांच्या बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न, एक पोलीसांच्या ताब्यात
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ED कडून अटकेची शक्यता, काय आहे प्रकरण?
- LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha