NSA Ajit Doval : मोठे षड्यंत्र? NSA अजित डोवाल यांच्या बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न, एक पोलीसांच्या ताब्यात
एका अज्ञात व्यक्तीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या घरात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला.
NSA Ajit Doval News : एका अज्ञात व्यक्तीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या घरात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या ही व्यक्ती चुकून आली की त्यामागे काही षडयंत्र आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही
अजित डोवाल यांच्या घरात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी एक अज्ञात व्यक्ती एनएसए अजित डोवाल यांच्या घरात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले मात्र, कोणतीही घटना घडण्यापूर्वीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. आणि आता स्थानिक पोलीस आणि विशेष कक्ष त्याची चौकशी करत आहेत. ही व्यक्ती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमच्या ताब्यात असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या ही व्यक्ती चुकून वाहनात घुसली की त्यामागे काही षडयंत्र आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
An unknown person tried to enter NSA Ajit Doval's residence. He was stopped by security forces & detained. Further investigations underway: Delhi Police Sources pic.twitter.com/XDljjCxuwM
— ANI (@ANI) February 16, 2022
तो व्यक्ती मानसिक रूग्ण - दिल्ली पोलिस
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, “अज्ञात व्यक्तीने NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला सुरक्षा दलांनी थांबवून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.” पोलिसांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. ही व्यक्ती भाड्याने घेतलेली कार चालवत होती. या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमच्या ताब्यात असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या ही व्यक्ती चुकून वाहनात घुसली की त्यामागे काही षडयंत्र आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
महत्वाच्या बातम्या :
- PM मोदी भजन-किर्तनात लीन होतात तेव्हा..! संत रविदास जयंतीनिमित्त दिल्लीत केली पूजा
- Ravidas jayanti 2022 :रविदासिया संप्रदाय काय आहे? ज्याचं पंजाबच्या राजकीय अन् सामाजिक जीवनात मोठं महत्व
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha