एक्स्प्लोर

Zika Virus : केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव; 23 जणांना लागण, अलर्ट जारी

Zika Virus : कोरोनापाठोपाठ केरळमध्ये झिका व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. आतापर्यंत 23 जणांना झिकाची लागण झाली आहे. केरळच्या आरोग्यमंत्र्यांकडून राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Zika Virus : केरळमध्ये कोरोना संसर्गानंतर आता झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केरळमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच दिल्लीहून तत्काळ तज्ज्ञांचं एक विशेष पथक केरळसाठी रवाना झालं होतं. केरळचे आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितलं की, केरळमध्ये झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये आणखी चार नवे झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे केरळमध्ये सध्या 23 रुग्णांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. 

झिका व्हायरसमुळे अलर्ट जारी 

केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी राज्यात अलर्ट जारी केला आहे. अशातच झिका व्हायरससोबत केरळमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भावही वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच डासामुळे हे आजार होतात. 

केरळ दौऱ्यावर असलेल्या दिल्ली एम्सच्या पथकानं झिका व्हायरसबाबत देशातील इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर आता दिल्ली आणि मुंबईसह देशातील अनेक मोठ्या शहरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळच्या शेजारील राज्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

डास चावल्यानं होणाऱ्या या आजाराचा पहिला रुग्ण केरळमध्ये गुरुवारी आढळून आला होता. परंतु, 48 तासांनी या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून आलं. या व्हायरसनं राज्यांसोबत केंद्र सरकारच्याही चिंतेत भर पडली आहे. एका गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. परंतु, शुक्रवारी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीनं आणखी 13 नमुन्यांची चाचणी केली होती. त्यानंतर या 13 व्यक्तिंनाही झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुरुवातीला 14 रुग्णांना झिका व्हायरसची लागण झाली होती. आता हा आकडा 23 वर पोहोचला आहे. 

काय आहे झिका व्हायरस? कसा होतो त्याचा प्रसार? 

झिका व्हायरसचा प्रसार हा एडीस प्रकारचा डास चावल्याने होतो. एडीस प्रकारच्या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप असे आजारही होतात. झिका व्हायरसचा प्रसार गर्भवती महिलेला झाल्यास तिच्या गर्भातही या व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपत्यामध्ये काहीतरी कमतरता निर्माण होते. या रोगाचा प्रसार साधारणपणे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात होतो. 

एडीस प्रकारातील डास हा शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी चावतो. सध्या जगातील 86 देशांमध्ये या प्रकाराचे डास आढळतात. 1947 साली आफ्रिकेत या रोगाचा शोध लागाला होता. 

काय आहेत लक्षणं?

ताप येणं, त्वचेवर चट्टे पडणं, सांधेदुखी ही झिका व्हायरसची प्राथमिक लक्षणं आहेत. डोकेदुखी, अस्वस्थता असे लक्षणंही होऊ शकतात. ही लक्षण सामान्यपणे दोन ते सात दिवसांपर्यंत कायम राहतात. सध्या झिका व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही औषध वा लस उपलब्ध नाही. 

डास चावण्यापासून संरक्षण करणे हाच सर्वात मोठा उपाय सध्या आपल्याकडे आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे किंवा डास होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे या गोष्टीमुळे मोठा परिणाम होऊ शकतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Zika Virus : देशात घोंघावतंय झिका व्हायरसचं संकट; दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत अलर्ट जारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget