एक्स्प्लोर
झाकीर नाईकच्या संस्थेकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाखांची देणगी
नवी दिल्ली: धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या संस्थेनं 2011 साली राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला तब्बल 50 लाख देणगी दिल्याची माहिती समोर येत आहे. एनआयएला मिळालेल्या काही महत्वाच्या कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे. जहाल भाषणं देऊन मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचा आरोप झाकीरवर आहे. बांगलादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीरचं नाव चर्चेत आलं होतं.
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशननं 2011 साली राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला 50 लाखांची देणगी दिली होती. त्याच्या एक महिन्यानंतर रुग्णालयाच्या मदतीनं 25 लाख देण्याची योजना होती. जेव्हा एनआयएनं झाकीर नाईकच्या घरावर आणि एनजीओवर छापा मारला होता त्यावेळी देणगीचे हे कागदपत्र त्यांच्या हाती लागले होते.
इस्लामिक रिसर्च फांऊडेशनकडे या देणगीची नोंद आहे. दरम्यान, राजीव गांधी फाऊंडेशनचं म्हणणं आहे की, हे पैसे राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आले होते. जे काही महिन्यानंतर त्यांना परतही करण्यात आले होते. दुसरीकडे इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचं म्हणणं आहे की, त्यांनी कोणतीही रक्कम अद्यापपर्यंत परत मिळालेली नाही.
दरम्यान, या संपू्र्ण प्रकरणावरुन भाजप आणि काँग्रेस मध्ये बरेच वाद-प्रतिवाद सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement