एक्स्प्लोर

New Labour Codes : हातात येणारा पगार घटणार, पीएफ वाढणार; लवकरच नवीन कामगार संहिता लागू होणार

सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराशी संबंधित महत्त्वाचा नियम सरकार लवकरच लागू करण्याच्या तयारीत आहे. चारही कामगार संहिता (Labour Codes) लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार घटणार असून पीएफ मात्र वाढणार आहे.

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यात चारही कामगार संहिता (Labour Code) लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या कामगार संहिता लागू करण्याची तयारी करत आहे. ही संहिता लागू होण्याआधी कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार (In-Hand Salary) कमी होणार आहे. सोबतच कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडमध्ये जास्तीचं योगदान द्यावं लागेल. ही संहिता लागू झाल्याने कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी, भत्ता आणि पीएफ योगदानाची गणनेत मोठा बदल होईल.

या चार कामगार संहितांमध्ये औद्योगिक संबंध (Industrial Relations), वेतन (Wages), सामाजिक सुरक्षा (Social Security), व्यावसायिक आरोग्य सुरक्षा आणि कामाची परिस्थिती समाविष्ट आहे. (Occupational Health Safty & Working Conditions) समाविष्ट आहेत. कामगार मंत्रालयाने यापूर्वी नवीन आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून या कामगार संहितेच्या अंमलबजावणीची कल्पना दिली होती. परंतु ते टाळण्यात आली, जेणेकरुन नवीन वेतन संहितेनुसार कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांच्या पगाराची फेररचना करण्यासाठी अधिक वेळ मिळाला.

मंत्रालयानेही या चार संहितांतील नियमांना अंतिम रुप दिलं होतं. परंतु त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही, कारण बरीच राज्ये या संहितांनुसार हे नियम लागू करण्याच्या स्थितीत नव्हती. भारतीय राज्यघटनेत श्रम हा समान विषय आहे. याचा अर्थ असा की केंद्र आणि राज्य अशा दोघांनीही या चार संहितांच्या अंतर्गत हे नियम अधिसूचित करावे लागतील, तरच हे कायदे संबंधित राज्यांमध्ये प्रभावी ठरतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, "अनेक प्रमुख राज्यांनी या चार कामगार संहितांच्या अंतर्गत येणाऱ्या नियमांना अंतिम रुप दिलेलं नाही. तर काही राज्ये या संहितांच्या अंमलबजावणीसाठी नियमांना अंतिम स्वरुप देण्याच्या प्रक्रियेत आहेत. राज्य सरकारे या नियमांना अंतिम स्वरुप देतील याची प्रतीक्षा केंद्र सरकार कायमच करु शकत नाही. अशा परिस्थितीत एक-दोन महिन्यात या लेबर कोडची अंमलबजावणी करण्याचा केंद्र सरकारची योजना आहे, कारण कंपन्यांनाही नव्या कायद्याचा ताळमेळ लागावा यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.

दरम्यान नवीन वेतन कोड (wages code) अंतर्गत सर्व भत्ते हे एकूण वेतनाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. यामुळे कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी एकूण वेतनाच्या 50 टक्के होईल. तर त्याच वेळी कर्मचारी आणि कंपनी अशा दोघांचंही पीएफ योगदान (PF Contribution) वाढेल. यासोबत ग्रेज्युटीची रक्कमही वाढेल. याचा थेट अर्थ म्हणजे कर्मचाऱ्याचं वेतन वाढेल पण त्याची इन-हॅण्ड सॅलरीत मात्र घट होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget