एक्स्प्लोर
मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ अपात्र, हायकोर्टात याचिका
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे पदासाठी अपात्र आहेत, अशी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल झाली आहे. याबाबत महाधिवक्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि न्यायमूर्ती वीरेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. संजय शर्मा या व्यक्तीने ही जनहित याचिका दाखल केली आहे.
खासदार हा कोणत्याही राज्याचा मंत्री होऊ शकत नाही. संविधानातील 10(2) या कलमाचं हे उल्लंघन आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांना अपात्र ठरवण्यात यावं. कारण दोघेही सध्या खासदार आहेत, असं याचिकेत म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement