एक्स्प्लोर

Wrestlers Protest: "आम्ही मागे हटलेलो नाही, आंदोलन..."; व्हिडीओ जारी करत साक्षी मलिकचं आवाहन

Sakshi Malik On Wrestlers Protest: ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकनं सोमवारी एक व्हिडीओ ट्वीट करताना आम्ही मागे हटलेलो नाही, असा पुन्हा पुनरुच्चा केला.

Sakshi Malik On Wrestlers Protest: कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers Protest) सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार साक्षी मलिकनं (Sakshi Malik) केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. पण 28 मे रोजी दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झालेल्या झटापटीनंतर आंदोलन मोडून काढण्यात आलं. कुस्तीपटूंनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर एफाआयआर दाखल करुन त्यांना सोडण्यात आलं. अशातच साक्षी मलिकनं सोमवारी (29 मे) सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आणि कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी आवाहन केलं आहे. साक्षी मलिक म्हणाली की, "आम्ही मागे हटलेलो नाही." 

रविवारी (28 मे) विनेश फोगट, बजरंग पुनिया, संगीता फोगट, साक्षी मलिक आणि इतर अनेकांना दिल्ली पोलिसांनी महिला महापंचायतीसाठी नव्या संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेतलं होतं. यानंतर आंदोलकांचं सामान जंतरमंतरवरून हटवण्यात आलं.

कुस्तीपटूंना रविवारी ताब्यात घेतल्यानंतर काही वेळानं सोडून देण्यात आलं. आंदोलक कुस्तीपटूंना जंतरमंतरवरुन हटवल्यानंतर एका दिवसानं, दिल्ली पोलिसांनी सोमवारी (29 मे) कुस्तीपटूंना जंतरमंतर वगळता इतर कोणत्याही योग्य ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली जाईल, असं सांगितलं. 

व्हिडीओमध्ये साक्षी मलिकनं काय म्हटलंय? 

कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, "माझा सर्वांना नमस्कार, कारण आपणा सर्वांना माहित आहे की, 28 मे रोजी आम्ही शांततेनं मोर्चा काढला होता आणि पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं, अटक केली आणि आमच्यावर एफआयआर दाखल केला, आम्ही कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं किंवा कोणाचंही नुकसान केलेलं नाही. एका महिलेला 20-20 पोलीस रोखत होते. त्यांनी आमच्यावर किती अत्याचार केले, हे तुम्ही स्वतःच समजू शकता, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता." 

"हा व्हिडीओ बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे, आमचे समर्थक, जे अजूनही कुठे-कुठे थांबले आहेत. गुरुद्वारामध्ये आमची वाट पाहत आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, पोलिसांनी सोडल्यानंतर संपूर्ण दिवस आम्ही आंदोलनाची रूपरेषा आखण्यात मग्न होतो. आम्ही मागे हटलो नाही, आंदोलन सुरूच राहील आणि जे काही होईल ते आम्ही लवकरच कळवू. तुम्ही असेच सपोर्ट करत रहा. धन्यवाद.''

28 मे रोजी जंतरमंतरवर घडलं काय? 

देशाची राजधानी दिल्लीत नव्या संसदेचं लोकार्पण होत असतानाच दुसरीकडे दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर भर रस्त्यात बळाचा वापर करुन त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यात आलं. कुस्तीपटूंवर केलेल्या बळाच्या वापरानं काँग्रेसकडून पीएम मोदींवर कडाडून हल्ला चढवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानतंर नव्या संसदेसमोर झटापट झाली. बॅरिकेट्स ओलांडून पैलवान नवीन संसदेच्या दिशेनं कूच करत असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखत बजरंग पुनिया, विनेश-संगिता फोगट, साक्षी मलिक यांना ताब्यात घेतलं. 

दिल्ली पोलिसांनी एवढ्यावर न थांबता जंतर-मंतरवरील तंबू, खुर्च्या आणि इतर वस्तू हटवून आंदोलन मोडीत काढले. विनेश आणि संगीता फोगट यांना दिल्लीतील कालकाजी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. गेल्या 34 दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू नव्या संसदेसमोर होत असलेल्या महिला महापंचायतीत सहभागी होणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी दिली नाही. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पैलवानांनी महापंचायत आयोजित करून संसदेच्या दिशेनं कूच करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंवर बळाचा वापर केला. 

जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं आंदोलन 

कुस्तीपटू गेल्या 34 दिवसांपासून जंतरमंतरवर निदर्शनं करत आहेत आणि WFI प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आहेत. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून भाजप खासदारांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?

व्हिडीओ

Shivaji Park Sabha:शिवाजीपार्कसाठी रस्सीखेच,शिवाजी पार्क मैदानावर कुणाचा आवाज घुमणार? Special Report
Latur News : विम्याच्या पैशासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव, वद्धाच्या जीववर बेतला Special Report
Manrega Name Change : मनरेगा, 'जी राम जी' मध्ये फरक काय? विरोधकांचा गदारोळ Special Report
Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget