एक्स्प्लोर
लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार
लेह : चीनपासून वाढता धोका पाहता मोदी सरकारने रेल्वेचं जाळं आता लेह-लडाखपर्यंत विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बिलासपूर-मंडी-मनाली-लेह रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्वेक्षणाचं उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लेहमध्ये केलं.
बिलासपूरहून मनाली आणि नंतर लेह पर्यंत जाणारा हा रेल्वेमार्ग सुमारे 500 किलोमीटर अंतराचा असेल. हा जगातील सर्वात उंच भागातून जाणारा रेल्वेमार्ग ठरणार आहे. यासाठी 50 हजार कोटींचा खर्च येण्याचा अंदाज आहे.
बिलासपूर-लेह रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणासाठी 157 कोटी रुपयांचा निधी असून त्यापैकी 40 कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत. कुठल्याही ऋतूमध्ये लेह-लडाखपर्यंत अंतर कापता यावं, यासाठी संरक्षण मंत्रालय हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याच्या तयारीत आहे.
दुसरीकडे, लेहला श्रीनगरशी जोडण्यासाठीच्या दुसऱ्या रेल्वेमार्गाचा पण विचार सुरु असल्याचं म्हटलं जातं. जोजिला-कारगिलमार्गे लेहपर्यंत रेल्वेमार्ग विस्तारण्याचा विचार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement