एक्स्प्लोर

सावधान! जगाची चिंता वाढली, नवीन वर्ष 2025 ठरणार सर्वात उष्ण? WMO वर्तवला अंदाज 

Climate Change : 2025 हे नवीन वर्ष सर्वात जास्त उष्ण ठरण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान संघटनेने (WMO) याबाबतचा इशारा दिला आहे. 

Climate Change : जगभरातील वातावरणात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. बदलत्या हवामानाचा (Climate Change) मोठा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. 2024 वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे वर्ष जसे उष्ण राहिले, तसेच 2025 हे नवीन वर्ष देखील सर्वात जास्त उष्ण ठरण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान संघटनेने (WMO) याबाबतचा इशारा दिला आहे. 

पुढील वर्षी देखील या वर्षीसारखेच विक्रमी तापमान दिसून येईल असा अंदाज WMO ने व्यक्त केला आहे. त्यामुळं हरितगृह वायूंची पातळी आणखी वाढू शकते. ज्यामुळं भविष्यात आपल्याला अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. WMO च्या मते, 2024 नंतर 2025 हे सर्वात उष्ण वर्षांपैकी एक असू शकते. त्याचा परिणाम जगभर दिसून येईल. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, गेलं एक दशक झालं आपण प्राणघातक उष्णतेतून जात आहोत. जे देश शांत आणि निरोगी भविष्यासाठी काम करत आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही उभे असल्याचे ते म्हणाले. WMO चा संदर्भ देत गुटेरेस म्हणाले की, 2015 ते 2024 पर्यंतच्या हवामान बदलाने स्पष्ट संकेत दिले आहेत.

भविष्यातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता

दरम्यान, या हवामान बदलाच्या स्थितीतून आपण बाहेर पडलो नाही, तर भविष्यातील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा गुटेरेस यांनी दिला. त्यांच्या मते, 2025 मध्ये अनेक देशांना उत्सर्जन कमी करावे लागेल आणि सुरक्षित मार्गाचा अवलंब करावा लागेल. ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी काम करावं लागेल. स्वच्छ आणि शाश्वत उर्जा स्त्रोतांकडे आपण वाटचाल करायला हवी असेही टोनियो गुटेरेस म्हणाले.  

हवामान बजलाच्या संकटाचा सामना करण्याची प्रत्येकाची जबाबदारी 

हवामान बदलाच्या संकटावर काम करणं ही एका देशाची जबाबदारी नसून ती जागतिक जबाबदारी आहे. हवामान संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक देशाला एकजुटीने काम करावे लागेल. आपल्या भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण निर्माण करणे हे आपल्या पिढीचे कर्तव्य असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. 

हवामान बदलाचा शेती क्षेत्राला देखील मोठी फटका

दरम्यान, सध्या हवामान बदलाचा मोठा फटका जगभरातील अनेक देशांना बसत आहे. याचा आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान बदलाचा शेती क्षेत्राला देखील मोठी फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget