एक्स्प्लोर
दिल्लीत 800 किलो तर नागपुरात 500 किलो खिचडी शिजली
संजीव कपूर यांच्यासोबत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर, योगगुरु रामदेव बाबा यांची यावेळी उपस्थिती होती.
नवी दिल्ली: दिल्लीत सुरु असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी 800 किलो खिचडी तयार केली. अनेक पोषक धान्य आणि डाळींचा वापर करुन ही खिचडी बनवली
संजीव कपूर यांच्यासोबत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर, योगगुरु रामदेव बाबा यांची यावेळी उपस्थिती होती.
ही खिचडी बनवण्यासाठी 1 हजार लीटर क्षमतेची कढई वापण्यात आली. ही खिचडी बनवण्यासाठी संजीव कपूर यांना 50 लोकांनी मदत केली. संजीव कपूर यांच्या प्रयत्नाची गिनीज बुकमध्ये नोंद होण्याचीही शक्यता आहे.
नागपूरमध्येही 500 किलो खिचडी
इकडे नागपूरमध्येही आंतरराष्ट्रीय खाद्यदिनानिमित्त विष्णूजी की रसोई आणि मैत्री परिवार संस्थेद्वारे 500 किलो खिचडी तयार करण्यात आली. सकाळपासून इथं खिचडी बनवण्याचं काम सुरु झालं. यासाठी मोठा मंडप घालण्यात आला आहे.
शेफ विष्णूजी सकाळापासून ही खिचडी बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत. नागपूरकरांना ही खिचडी मोफत दिली जाणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement