World Braille Day 2023 : वयाच्या तिसऱ्या वर्षी गमावली दृष्टी, तरी बनला अंधाचा प्रकाशदूत; ब्रेल लिपीचे जनक 'लुई ब्रेल' यांची कहाणी
World Braille Day : वयाच्या तिसऱ्या वर्षी दृष्टी गमावलेले 'लुई ब्रेल' हे अंधाचा प्रकाशदूत बनले. त्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला.
World Braille Day 2023 : वयाच्या तिसऱ्या वर्षी अपगाताने दृष्टी गमावली. तरी देखील वयाच्या 16 व्या वर्षी लुई ब्रेल (luis braille) हे अंधांचा प्रकाशदूत बनले. त्यामुळेच त्यांना ब्रेल लीपीचे जनक म्हटले जाते. ब्रेल लिपीचे जनक 'लुई ब्रेल' यांची कहाणी खरच प्रेणादायी आहे. आज त्यांची जयंती आहे. ब्रेल लीपीचा शोध लावल्यामुळेच त्यांच्या जयंतीनिमित्त (Anniversary) आणि दृष्टिहीन (Blind) लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण म्हणून 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस (World Braille Day) म्हणून पाळला जातो.
लुई ब्रेल हे फक्त तीन वर्षांचे असताना त्यांचा अपघात झाला. खेळता खेळता एक धारदार वस्तू त्यांच्या डोळ्यात गेली आणि ते अंध झाले. लहान मुलाची दृष्टी गेल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत पडले. पण लुई ब्रेल हा मुलगा खूप हुशार होता. अंधांनाही वाचता येईल असे काही तंत्रज्ञान निर्माण करता येईल का यावर त्यांनी काम सुरू केले. योगायोगाने एके दिवशी त्यांची भेट फ्रेंच सैन्यातील कॅप्टन चार्ल्स बार्बियरशी झाली. त्यांनी लुई ब्रेलला रात्रीचे लेखन आणि सोनोग्राफीबद्दल सांगितले. येथेच त्यांना ब्रेल लीपीची कल्पना सुचली.
पुढे त्यांनी आपली कल्पना सत्यात उतरवण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांनी सैनिकांच्या लिपीत बदल करून सहा-बिंदू असलेली लिपी तयार केली, ज्याद्वारे दृष्टिहीनांना सहज वाचता येईल यासाठी प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी खुणा देखील दाखवल्या. या लिपीच्या आविष्काराने अंध लोकांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. लुई ब्रेलने आपल्या कर्तृत्वाने त्याच्यासोबतचा अपघात यशाची शिडी बनवला. एवढेच नाही तर आजही अंध व्यक्ती या शिडीचा वापर करून यशस्वी झालेली अनेक उदाहरणे आहेत.
लुई ब्रेल यांनी त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे त्यांच्या प्रयत्नांच्या बळावर दूर केले. अंधांच्या आयुष्यात प्रकाशाचा दिवा लावणाऱ्या ब्रेलच्या जीवनाची ज्योत अवघ्या 43 व्या वर्षी विझली. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ज्योत ब्रेल लिपीच्या माध्यमातून अनेक अंधांच्या डोळ्यात तेवत आहे. लुई ब्रेल सारखी अनेक व्यक्तिमत्वे स्वतः अंधारात राहून त्यांच्या संघर्षाने आणि धैर्याने इतरांची घरे उजळून टाकतात.
World Braille Day 2023 luis Braille : फ्रान्समध्ये झाला जन्म
1809 ला फ्रान्सची राजधानी पॅरिस (Paris) पासून अठ्ठावीस मैल अंतरावर असलेल्या ‘कुपव्रे’या गावात सायमन आणि मोनिक या दाम्पत्याच्या पोटी लुई ब्रेल यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबांचा तीन हेक्टर जमिनीत छोटसा वाईनयार्ड आणि चामड्याचा लघुद्योग होता. त्यांना तीन मोठी भावंडं होती. तिन्ही मोठ्या भावंडांसोबत त्याचंही बालपण लाडाकोडात नुकतेच सुरू झाले होते. जसे हे मुल चालायला लागले तशी त्याची पावलं बाबाच्या छोटेखानी कारखान्याकडे वळू लागली. वयाच्या तिसऱ्या वर्षी असंच एकदा नेहमीप्रमाणे खेळत असतांना ते चामड्याला होल करत बसले होते. त्यावेळी अणकुचीदार आरीनं त्यांच्या डोळ्याला इजा झाली. त्यातच त्यांची दृष्टी कायमची गेली.