Work From Home New Rules : वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले 'वर्क फ्रॉम होम'चे नियम, जाणून घ्या याबाबत माहिती
Work From Home New Rules : वाणिज्य मंत्रालयाने वर्क फ्रॉम होम संबंधित नवीन नियम जाहीर केले आहेत. (SEZ) च्या कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त एक वर्षासाठी घरून काम करण्याची परवानगी असेल.
Work From Home New Rules : वाणिज्य मंत्रालयाने वर्क फ्रॉम होम संबंधित नवीन नियम जाहीर केले आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) च्या कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त एक वर्षासाठी घरून काम करण्याची परवानगी असेल.
जास्तीत जास्त एक वर्षासाठी परवानगी
वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये (SEZ) घरून काम करण्याची परवानगी जास्तीत जास्त एक वर्षासाठी दिली जाईल आणि एकूण कर्मचार्यांच्या 50 टक्क्यांपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. वाणिज्य विभागाने विशेष आर्थिक क्षेत्र नियम 2006 मध्ये घरून काम करण्यासाठी नवीन नियम 43A अधिसूचित केले आहे.
कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश?
उद्योगा क्षेत्राकडून आलेल्या मागणीच्या आधारे ही अधिसूचना जारी करण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. उद्योगाने सर्व विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी एकसमान WFH धोरणाची मागणी केली होती. नवीन नियमानुसार, SEZ युनिट्समध्ये काम करणार्या काही श्रेणीतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाईल. या कर्मचाऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि एसईझेड युनिट्समध्ये काम करणाऱ्या संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जे कर्मचारी तात्पुरते कामावर येऊ शकत नाहीत ते देखील याच्या कक्षेत येतील. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एकूण कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली जाऊ शकते.
50 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना परवानगी
यामध्ये (SEZ) युनिटमधील कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. SEZ च्या विकास आयुक्तांना वैध कारणास्तव 50 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याचा अधिकार दिला जाईल. मंत्रालयाने म्हटले आहे की, "घरातून काम करण्यास आता कमाल एक वर्षाच्या कालावधीसाठी परवानगी देण्यात आली आहे. विकास आयुक्त युनिटच्या विनंतीवरून एका वेळी एक वर्षाच्या कालावधीसाठी वाढवू शकतात".
कोरोनामध्ये Work From Home ची प्रथा
भारतात कोविड महामारीच्या सुरुवातीपासून 'घरातून काम' (Work From Home) करण्याची प्रथा वाढली आहे. लॉकडाऊन दरम्यान, अनेक संस्थांनी घरून काम केले. मात्र, परिस्थितीत सुधारणा झाल्याने आता पुन्हा एकदा सर्व संस्था सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर अनेक संस्था आजही त्याची अंमलबजावणी करत आहेत.