एक्स्प्लोर

548 लोकांच्या सर्व्हेवरुन भारत महिलांसाठी धोकादायक कसा?: महिला आयोग

भारत महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देश आहे हा ‘थॉमसन रायटर्स फाउंडेशन’चा दावा राष्ट्रीय महिला आयोगाने फेटाळला आहे.

नवी दिल्ली:  राष्ट्रीय महिला आयोगाने भारत महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देश आहे हा ‘थॉमसन रायटर्स फाउंडेशन’चा दावा फेटाळला आहे. अवघ्या 548 लोकांच्या सर्व्हेवरुन संपूर्ण देशाचा निष्कर्ष कसा काढला? असा सवाल महिला आयोगाने उपस्थित केला आहे. या सर्व्हेनुसार महिलांसाठी असुरक्षित असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात महिलांवर लैंगिक अत्याचार करणं फारच सोपं आहे, हेच महिलांच्या असुरक्षिततेमागचं मुख्य कारण देण्यात आलं आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महिला असुरक्षिततेबाबतीत भारत हा अफगाणिस्तान आणि सौदीपेक्षाही वरच्या क्रमांकावर आहे. मात्र भारताच्या महिला आयोगाने या सर्व्हेवर आक्षेप घेतला आहे. महिला आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या मते, “थॉमसन रायटर्स फाउंडेशन’ने जो दावा केला आहे, त्याचं प्रमाण, त्याचे नमुने (सॅम्पल साईज) खूपच कमी होते. त्यावरुन संपूर्ण देशाचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ज्या देशात महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचीही परवानगी नाही, त्या देशांचाही नंबर भारतापेक्षा खालचा आहे. त्यामुळे हा सर्व्हे चुकीचा आहे” अवघ्या 548 जणांचा सर्व्हे ‘थॉमसन रायटर्स फाउंडेशन’ने फोन आणि वैयक्तिकरित्या 26 मार्च ते 4 मे यादरम्यान हा ऑनलाईन 548 लोकांचा सर्व्हे केला. या सर्व्हेत युरोप, आफ्रिका, अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. यापूर्वी 2011 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत, महिलांसाठी अफगाणिस्तान सर्वात धोकादायक देश होता. त्यानंतर कांगो, मग पाकिस्तान आणि त्यानंतर चौथ्या स्थानावर भारत होता. पण ताज्या सर्व्हेत पाकिस्तान सहाव्या स्थानावर तर भारत पहिल्या स्थानावर गेला आहे. या सर्व्हे एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, भारताने 2012 साली निर्भया प्रकरण होऊनही महिला सुरक्षेच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले नाहीत. परिणामी, सात वर्षांपूर्वी चौथ्या स्थानी असलेला भारत आता पहिल्या स्थानी गेला. अमेरिका तिसऱ्या क्रमांकाचा असुरक्षित देश भारत या क्रमवारीत पहिल्या स्थानी आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच दुसरी खळबळजनक गोष्ट या सर्व्हेतून समोर आली आहे. महिलांसोबत सर्वाधिक लैंगिक हिंसा होणाऱ्या देशात अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. संबंधित बातम्या  भारत महिलासांठी सर्वात असुरक्षित देश : सर्व्हे 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोलहापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोलहापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोलहापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोलहापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Ahilyanagar Crime News: तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!
तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!
Solapur : सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी?
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी?
Kolhapur ZP election: कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Embed widget