एक्स्प्लोर

Manipur Violence : पोलिसांनी आम्हाला 'त्या' नराधमांच्या ताब्यात दिलं, विवस्त्र धिंड काढलेल्या महिलेची प्रतिक्रिया

Manipur Women Viral Video : मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर त्यांच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचंही उघडकीस आलं आहे.

Manipur Violence : मणिपूरमधील घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या संतापजनक घटनेनं सर्वत्र खळबळ माजली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली तेव्हा पोलीसही तेथे उपस्थित होते, ही बाब आता उघडकीस आली आहे. विवस्त्र करून धिंड आणि लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे. पोलिसांनीच आम्हाला त्या नराधमांच्या ताब्यात दिल्याचं म्हटलं आहे. यामुळे आणखीनच खळबळ माजली आहे.

'पोलिसांनी आम्हाला त्यांच्या ताब्यात दिलं'

मणिपूरमध्ये विवस्त्र करून धिंड आणि लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेनं सांगितलं आहे की, निर्वस्त्र धिंड काढण्यात आली तेव्हा पोलीस जमावासोबत होते. त्यांनीच आम्हाला त्या पुरुषांसोबत सोडले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दोन पीडितांपैकी एका महिलेने घडलेला प्रकार सांगितला आहे. या रिपोर्टनुसार, पीडित महिलेने सांगितलं की, ''आमच्या गावावर हल्ला करणाऱ्या जमावासोबत पोलीसही होते. पोलिसांनी आम्हाला घराजवळून उचललं आणि गावापासून थोडे दूर नेले आणि जमावासोबत रस्त्यावर सोडलं. आम्हाला पोलिसांनी त्या नराधमाच्या ताब्यात दिलं.''

विवस्त्र धिंड काढलेल्या महिलेची प्रतिक्रिया

मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा आणि त्यांच्या लैंगिक अत्याचार झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. पीडितांपैकी एकाने इंडियन एक्सप्रेसला माहिती सांगितलं की, त्यांना पोलिसांनी जमावाकडे सोडलं.

विवस्त्र धिंड, सामूहिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

मणिपूरमध्ये दोन महिलांचा विवस्त्र धिंड काढण्यात आली यापैकी एक महिलेचं वय सुमारे 20 आणि दुसऱ्या महिलेचं वय 40 आहे. पुरुषांच्या जमावाने या महिलांना निर्वस्त्र करुन रस्त्यावर चालण्यास भाग पाडलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काही पुरुष दोन महिलांना विवस्त्र करून शेताकडे ओढून जबरदस्तीने खेचताना दिसत आहेत. 18 मे रोजी दाखल करण्यात आलेल्या पोलीस तक्रारीत, पीडित महिलांनी क्रूरपणे विवस्त्र धिंड काढून सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले पोलीस?

मणिपूर पोलिसांचे एसपी के मेघचंद्र सिंह (K Meghachandra Singh) यांनी एक निवेदन जारी करून सांगितलं आहे की, महिलांना विवस्त्र करण्याची ही घटना 4 मे रोजी घडली आहे. यामध्ये आम्ही नॉनगपोक सेकमाई पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार, हत्या आणि अपहरण या कलमांसह इतर कलमांमध्ये दोषीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Manipur Violence : पोलिसांनी आम्हाला 'त्या' नराधमांच्या ताब्यात दिलं, विवस्त्र धिंड काढलेल्या महिलेची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Parliament Monsoon Session 2023: मणिपूरमधील घटना अत्यंत लज्जास्पद, दोषींना कठोर शिक्षा देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget