एक्स्प्लोर

अवैध बांधकाम पाडणाऱ्या महिला अधिकाऱ्याची हॉटेल मालकाकडून हत्या

अवैध बांधकाम हटवताना झालेल्या गोळीबारात महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दखल स्वत: सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.

शिमला : अवैध बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक महिला नगरविकास अधिकाऱ्यावर गेस्ट हाऊस मालकिणीच्या मुलाने चक्क गोळी झाडली. यात शैलबाला शर्मा यांचा मृत्यू झाला. तसंच एक पोलीसही गंभीर जखमी झाला आहे. हिमाचल प्रदेशातल्या कसौली इथे ही घटना घडली. विजयचा कारवाईत अडथळा शैलबाला शर्मा यांच्या नेतृत्त्वात प्रशासनाची टीम मंगळवारी सकाळी 11 वाजता कसौलीच्या नारायण गेस्ट हाऊसचं अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी गेस्ट हाऊसच्या मालकीण नारायण देवी आणि त्यांचा मुलगा विजयला समजावलं. पण काहीही न ऐकता ते कारवाईला विरोध करत होते. कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी विजयला ताब्यात घेण्यास सांगितलं. त्यावेळी विजयने अधिकाऱ्यांकडे काही वेळ मागितला. यानंतर प्रशासनाची टीम दुसऱ्या ठिकाणी कारवाईसाठी गेली. महत्त्वाचं म्हणजे विजस स्वत: वीज विभागात सरकारी कर्मचारी आहे. टीम दुसऱ्यांदा आल्याने गोळीबार मग दुपारी 2.30 च्या सुमारास शैलबाला पुन्हा गेस्ट हाऊसला पोहोचल्या. टीमचे सदस्य गेस्ट हाऊसच्या आत दाखल होताच रिसेप्शनजवळ उभ्या असलेल्या विजयने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला. स्वत:चा बचाव करण्यासाठी शैलबाला मागच्या दिशेने धावल्या. पण त्याचवेळी त्यांना एक गोळी लागली. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गोळीबारानंतर अतिक्रमणविरोधी कारवाई रोखण्यात आली. आरोपीवर एक लाखाचं बक्षीस दरम्यान या घटनेनंतर आरोपी विजय पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. विजयची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे. माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, असं कायदा व सुव्यवस्थेचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाची डेडलाईन हिमाचल प्रदेशातील हॉटेल आणि गेस्ट हाऊसचं अवैध बांधकाम तोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. 15 दिवसांच्या आत अवैध बांधकाम हटवा, असं हॉटेल मालकांना सांगण्यात आला होता. डेडलाईन संपल्यानंतर मंगळवारी प्रशासनाच्या चार टीम धर्मपूर-कसौलीत अवैध बांधकाम तोडण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाकडून दखल अवैध बांधकाम हटवताना झालेल्या गोळीबारात महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दखल स्वत: सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने या घटनेवर पोलिसांना फटकार लगावली. दिवसाढवळ्या गोळी झाडून महिला अधिकाऱ्याची कथितरित्या हत्या करण्यात आली, आरोपी पसार झाला आणि पोलिस केवळ पाहत राहिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवादLadki Bahin Yojana Update : अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं  सुद्धा परत देणार का?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 January  2024Kolhapur Boy On Buldhana Hair Loss | माझ्या औषधामुळे बुलढाण्यातील टक्कल पडलेल्यांना केस येऊ शकतात,'या' तरुणाचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget