एक्स्प्लोर
बिग बाजारच्या ट्रायल रुममध्ये तरुणीचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न
कोलकाता : बिग बाझारच्या ट्रायल रुममध्ये तरुणीचा व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला पकडलं आहे. कोलकातामध्ये ही घटना घडली आहे. तरुणीच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली.
छिद्रातून व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न
कोलकातामधी हायलॅण्ड पार्कमधील बिग बाजारमध्ये एक तरुणी शॉपिंगसाठी गेली होती. कपडे ट्राय करण्यासाठी ती चेंजिंग रुममध्ये गेली. मात्र तिथे एक छिद्र पाहिल्यावर तरुणीला धक्का बसला. कारण छिद्राच्या दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती तिला पाहत होता. इतकंच नाही तर तो व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर तिने आरडाओरडा सुरु केला. तरुणीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्नही केला, पण तिथून पळ काढण्यात त्याला यश आलं. मात्र त्याचा मोबाईल तिथेच पडला.
बिग बाजारने माफी मागितली
ज्या व्यक्तीने व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला, तो मॉलमध्ये काम करणाऱ्या एजन्सीचा कामगार होता, असं स्पष्टीकरण बिग बाजारने दिलं आहे. शिवाय बिग बाजारच्या स्थानिक अधिकाऱ्याने या प्रकाराबद्दल माफीही मागितली आहे. बिग बाजारने आरोपी व्यक्तीला कामावरुन काढलंच शिवाय एजन्सीला ब्लॅक लिस्टही केलं आहे.
पोलिस तपास सुरु
दरम्यान, तरुणीने या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement