Wing Commander Namansh Syal: थरथरली, रडली, मुलीला घेऊन आली; पत्नीकडून नमांश यांना अखेरचा सॅल्यूट, वायुसेनेचे अधिकारीही गहिवरले, VIDEO
Wing Commander Namansh Syal: दुबई एअर शोमध्ये तेजस विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या पत्नी विंग कमांडर अफसान यांनी अखेरचा निरोप देत सलामी दिली.

Wing Commander Namansh Syal: दुबई एअर शोमध्ये तेजस विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर नमांश स्याल (Wing Commander Namansh Syal) यांच्या पत्नी विंग कमांडर अफसान यांनी अखेरचा निरोप देत सलामी दिली. हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील पटियालकर गावात नमांश स्याल यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी नमांश स्याल यांची 6 वर्षांची मुलगी, वडील, आई आणि इतर नातेवाईक भावूक झाले.
View this post on Instagram
View this post on Instagram
शहीद नमांश स्याल यांच्या पत्नी अफसान यांच्या वेदना पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. निष्पाप मुलगी वडिलांना आर्त हाक देत असल्याचे जाणवले. अफसान यांनी थरथरणाऱ्या हातांनी, पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलीला घेऊन आल्या. त्यानंतर त्यांनी नमांश स्याल यांना अखेरची सलामी दिली. यावेळी उपस्थित असणारे वायुसेनेचे अधिकारीही गहिवरुन गेले. यादरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हे व्हिडीओ पाहून सर्वंच भावूक होत आहे.
View this post on Instagram
तेजसचा अपघात आणि नमांश स्याल यांना वीरमरण- (Wing Commander Namansh Syal Tejas)
दुबई एअर शोच्या शेवटच्या दिवशी विंग कमांडर नमांश स्याल तेजस या स्वदेशी लढाऊ विमानातून कमी उंचीवरुन एरोबॅटिक कसरती करत असताना त्यांचे विमान अचानक कोसळले. या दुर्घटनेत नमांश स्याल यांना वीरमरण आले. या अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डोळ्यांसमोर घडलेला हा अपघात पाहून उपस्थितांची गर्दी स्तब्ध झाली. टीव्हीवर या अपघाताची दृश्य पाहून अनेक जण हळहळले.
कोण आहेत नमांश स्याल? (Who Is Namansh Syal?)
वडील सैन्यदलातून निवृत्त, पत्नी हवाई दलातील अधिकारी नमांश स्याल यांचे वडील जगन नाथ सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी हिमाचल प्रदेशच्या शिक्षण विभागात मुख्याध्यापक म्हणून काम केले होते. नमांश यांच्या आई बिना देवी या अपघातावेळी हैदराबाद येथे मुलगा आणि सून यांना भेटायला गेल्या होत्या. नमांश यांच्या पत्नी अफसान यादेखील हवाई दलात अधिकारी आहेत.
























