एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदी सरकारविरोधात आंदोलन तीव्र करणार; संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रव्यापी बैठकीमध्ये एकमताने निर्णय
कृषि कायदे आणणाऱ्या मोदी सरकारविरोधात आंदोलन तीव्र करणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रव्यापी बैठकीमध्ये एकमताने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : आज शेतकरी आंदोलनाचा 25वा दिवस आहे. नवे कृषि कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. कडाक्याच्या थंडीतही आपल्या मागण्यांवर ठाम असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारविरोधातील लढा सुरुच आहे. आपले आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रव्यापी बैठकीमध्ये एकमताने काही निर्णय घेण्यात आले आहेत.
दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी आतापर्यंत आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना शहीदांचा दर्जा दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या या सर्व शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय- उद्यापासून दिल्ली बॉर्डरवरील सर्व आंदोलन स्थळांवर 11 प्रतिनिधी साखळी उपोषणाला बसणार. देशभरातील ज्या-ज्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी देखील साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन.
- दिनांक 23 डिसेंबर रोजी चौधरी चरणसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात किसान दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व देशवासियांना दुपारचे जेवण न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
- 25, 26, 27 डिसेंबर दरम्यान हरियाणा राज्यातील सर्व टोल नाक्यांवर टोलमुक्ती आंदोलन करण्यात येणार आहे.
- जगभरातील भारतीय नागरिकांना त्या-त्या देशांमध्ये धरणे आंदोलन करून भारतीय दूतावासामध्ये निवेदन देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
- 26 व 27 डिसेंबर रोजी एनडीएमधील भाजपेतर सर्व घटक पक्षांना शेतकरी विरोधी कायद्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी व सदरचे कायदे रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारवर दबाव आणावा असे आवाहन करण्यात येणार आहे.
- 27 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करणार आहेत, सदरची मन की बात आम्हाला ऐकायची नाही असा संदेश देण्यासाठी या मन की बात संबोधनादरम्यान देशातील सर्व नागरिकांनी टाळ्या, थाळ्या वाजवून निषेध व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- आजच्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेश व उत्तराखंड मधून येणाऱ्या शेतकऱ्यांवर उत्तर प्रदेश सरकार मार्फत अनेक ठिकाणी होत असलेल्या जुलमी दंडात्मक कारवाईचा निषेध करण्यात आला.
- आजच्या बैठकीमध्ये पंजाबमध्ये या आंदोलनाच्या समर्थनार्थ उतरलेल्या काही कलाकार तसेच आडते यांच्यावर ईडी मार्फत होत असलेल्या चुकीच्या कारवाईचा निषेध करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement