IND Written Number : वाहनांच्या नंबर प्लेटच्या कोपऱ्यावर IND का लिहिलेलं असतं? यामागचं कारण माहितीय?
IND Written Number : काही वाहनांच्या नंबर प्लेटवर IND लिहिलेलं असते हे तुम्ही पाहिलं असेल. पण, यामागचं कारण काय ते जाणून घ्या.
IND Written Number : कार (Car) असो किंवा दुचाकी (Two Wheeler) कोणतेही वाहन (Vehicle) खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी (Registration) करणे आवश्यक असते, हे आपल्याला माहित आहे. वाहनाची नोंदणी (Vehicle Registration) केल्यानंतर आपल्याला नंबर प्लेट (Number Plate) मिळते, त्यावर कोड (Code) आणि नंबर (Number) लिहिलेला असतो. भारतात प्रत्येक वाहनाची नोंदणी मोटार वाहन कायदा 1989 (Motor Vehicle Act) अंतर्गत केली जाते. काही वाहनांच्या नंबर प्लेटवर IND लिहिलेलं असते (IND Written Number) हे तुम्ही पाहिलं असेल. पण, यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का, याचा अर्थ नेमका काय ते सविस्तर जाणून घ्या.
काही वाहनांच्या नंबर प्लेटवर IND का लिहिलेले असते?
काही वाहनांमध्ये (Vehicle) विशिष्ट प्रकारची उंचावलेली नंबर प्लेट (Number Plate) असते, ज्यावर होलोग्रामसह IND लिहिलेले असते. IND हे भारत शब्दाचं संक्षिप्त रूप आहे. IND हा शब्द उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट्सच्या वैशिष्ट्यांच्या सूचीचा भाग आहे. हा शब्द केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 (Motor Vehicle Act) मध्ये 2005 च्या दुरुस्तीचा भाग म्हणून सादर करण्यात आला होता. हा IND RTO च्या उच्च सुरक्षा क्रमांक (High Security Number Plate) नोंदणीकृत नंबर प्लेटवर आढळतो. विक्रेत्याने (Dealer) आणि प्रक्रिया किंवा कायद्यानुसार घेतले असल्यास, नंबर प्लेटवर क्रोमियम-प्लेटेड होलोग्राम (Hologram) देखील चिकटवलेला असतो, जो काढला जाऊ शकत नाही. अशा प्रकारची नंबर प्लेट (Specia Number Plate) विशेष परिस्थितीत सरकारद्वारे जारी केली जाते.
नंबर प्लेटचा नेमका अर्थ काय?
या नंबर प्लेट (Number Plate) ला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (High Security Number Plate) म्हटलं जातं. ही नंबर प्लेट बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे सुरक्षा (Safety). या नंबर प्लेटमध्ये काही सुरक्षा वैशिष्ट्ये (Safety Feature) आहेत. यामध्ये छेडछाड-प्रूफ आणि स्नॅप लॉक सिस्टम (Snap Lock System) जी काढता येणार नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांकडून स्नॅप लॉक (Snap Lock) चे अनुकरण करणं जवळजवळ अशक्य आहे. या नंबर प्लेट च्या वाहन मालकांना दहशतवाद्यांकडून (Terrorist Activity) वाहन चोरी (Vehicle Theft) किंवा गैरवापरापासून (Criminal Activity) संरक्षण मिळतं. त्यामुळे ही नंबर प्लेटसा उच्च सुरक्षा म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :