एक्स्प्लोर
बेहिशेबी मालमत्ता जाहीर करणाऱ्या महेश शाहला व्हीआयपी ट्रिटमेंट का?
अहमदाबाद: तब्बल 13 हजार 860 कोटींची बेहिशेबी संपत्ती गोळा केलेल्या महेश शाहला शनिवारी अहमदाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण काही तासांतच त्याला पोलीस संरक्षणात घरी पोहोवलं. एवढंच नाही तर कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याला पोलीस गणवेशात सुरक्षित घरी पोहोचवण्यात आलं. पोलीसांबरोबरच आयकर विभागानेही महेश शाहाबाबत नरमाईचे धोरण अवलंबलंय. एरवी कुणा प्रामाणिक करदात्याचे हजार-दीड हजार चुकवायचे राहिले तर त्याला बेजार करणारा आयकर विभाग महेश शाहवर एवढी मेहरबान का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
13 हजार कोटींची बेहिशेबी संपत्ती घोषित करणाऱ्या प्रॉपर्टी डीलर महेश शाहना आयकर विभागाने शनिवारी टीव्ही चॅनेलच्या बाहेरून ताब्यात घेतले होतं. त्याने जाहीर केलेल्या संपत्तीविषयी संशय असूनही त्याला पकडता आलं नाही.
इनकम डिस्क्लोजर स्कीम बंद होण्याच्या फक्त अर्धा तास आधी तब्बल 13 हजार 860 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती जाहीर करणाऱ्या महेश शहाला त्याच्याकडून टॅक्सचा पहिला हफ्ता आला नाही म्हणून फरार जाहीर करण्यात आलं.
महेश शाहांचा जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. अशी माहिती त्यांच्या सीएने दिली. मात्र हजारो कोटींची बेहिशेबी संपत्ती जाहीर करणाऱ्या शाहला स्वतःचं साधं कार्यालयही नाही. जे होतं ते त्यांनी एका कच्छी दाबेली व्यावसायिकाला विकून टाकलंय.
वास्तविक, महेश शाहने 13 हजार कोटीची बेहिशेबी संपत्तीची माहिती आयकर विभागाला दिल्यानंतर, सर्वांचेच डोळे विस्फारले होते. कारण, जोधपूर परिसरातील मंगलज्योत अपार्टमेंटमध्ये त्यांच्या शेजाऱ्यांच्या मते, तो अतिशय कंजूस आहे. 13 हजार कोटीच्या संपत्तीची शेखी मिरवणारा महेश विमानतळावर जातानाही, कारऐवजी रिक्षाने प्रवास करतो. रिक्षा चालकालाही एक रुपयाही जास्त भाडे देताना त्याचा जीव कासावीस होतो. विशेष म्हणजे सोसायटीतील कोणाही व्यक्तीला त्याने आजपर्यंत साधा एक चहाही पाजलेला नाही. परिसरातील अनेक भाजीविक्रेते आणि पानपट्टी चालकांकडे त्याची उधारी थकीत आहे. अशा कंजूस माणसासाठी अहमदाबाद पोलीस आणि आयकर विभाग पायघड्या घालत असल्याचं दिसतं.
सध्या महेश शहाला एखाद्या मंत्र्यासारखी व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. 13 हजार 860 कोटीची बेहिशेबी संपत्ती जाहीर करुन, वारंवार आपलं वक्तव्य बदलणाऱ्या महेश शहावर आयकर विभाग कमालीचा मेहरबान आहे. तसंच सध्या त्याच्या खातिरदारीत अहमदाबाद पोलीस कसलीही कुचराई करत नाहीत.
आज सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महेश शाहला बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कोणतीही चौकशी न करता सोडून दिले. विशेष म्हणजे, तो आपल्या मुलीच्या घरी परततानाही पोलिसांच्या लवाजम्यासह पोहोचला. याचे फोटो त्याच्या मुलीच्या अपार्टमेंटमधील काही रहिवाशांनी टिपल्याने महेश शहाचा हा शाही पाहुणचार समोर आला आहे.
विशेष म्हणजे, महेश जेव्हा आपल्या मुलीच्या घरी येत होता, तेव्हा तो पोलिसांच्या खाकी वर्दीत होता. त्यामुळे त्याला खाकी वर्दीत पाहून सर्वच अचंबित झाले. पोलिसांकडून महेश शहाला सुरक्षित घरी पोहचवण्यासाठी ही खबरदारी घेतली गेल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्याच्या या व्हीआयपी ट्रिटमेंटवरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement