एक्स्प्लोर

National Flag : भारताचा राष्ट्रध्वज अधिकृतपणे कधी स्वीकारण्यात आला? काय आहे राष्ट्रध्वजाची नियमावली; जाणून घ्या संपूर्ण माहिती

National Flag Of India : जगातील अनेक देशांचे ध्वज धार्मिक आधारावर बनवले गेले आहेत. मात्र, भारताचा राष्ट्रध्वज विविधतेत एकता दर्शवतो. हाच राष्ट्रध्वज फडकविण्याच्या काही नियमावली आहेत. 

National Flag Of India : भारतीय राष्ट्रध्वज (National Flag Of India) हा 22 जुलै 1947 रोजी, भारत (India) देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 24 दिवस आधी स्वीकारण्यात आला. आपला राष्ट्रध्वज केवळ शांतता आणि बंधुभावासाठी वर्तमान भारताचे प्राधान्य दर्शवत नाही, तर भारतीय संस्कृतीचा महान वारसा देखील जगासमोर ठेवतो. जगातील अनेक देशांचे ध्वज धार्मिक आधारावर बनवले गेले आहेत. मात्र, भारताचा राष्ट्रध्वज विविधतेत एकता दर्शवतो. हाच राष्ट्रध्वज फडकविण्याच्या काही नियमावली आहेत. 

राष्ट्रध्वज फडकविण्याची नियमावली :

  • भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण आणि अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकवित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश होता. 
  • संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक आणि मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार आणि अन्य सुट्टीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातो. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.
  • संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे आणि आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो. ध्वज फडकविताना आणि उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी अथवा दर्शनी भागात आडवा आणि तिरपा फडकविताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. यामध्ये ध्वज फडकविताना प्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.
  • राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकविला गेला पाहिजे की, मान्यवरांचे तोंड हे उपस्थितांकडे पाहिजे आणि ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. किंवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे आणि भिंतीवर आडवा फडकविला पाहिजे. पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा आणि त्यावर फडकवावा.
  • संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.
  • राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती आणि पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे. ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
  • ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कपडे घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठलेही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.
  • केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत उभे पाहिजेत.सरकारी अधिकाऱ्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Embed widget