एक्स्प्लोर
छत्तीसगडमध्ये मोदींची जंगल सफारी, 'शिवाजी' वाघाची फोटोग्राफी
रायपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नया रायपूरमध्ये जंगल सफारीचा आनंद लुटला. जंगल सफारीच्या वेळी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचीही हौसही पूर्ण केली. 'शिवाजी' या वाघाचे फोटो मोदींनी कॅमेरात कैद केले.
छत्तीसगडच्या स्थापनादिनानिमित्त मोदी रायपूरमध्ये आले होते. मात्र त्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी मोदींचं हेलिकॉप्टर ट्रिपल आयटी कॅम्पसमध्ये उतरलं. तिथं मोदींनी पिंजऱ्यात कैद असलेल्या वाघांची फोटोग्राफी केली.
जवळपास 25 मिनीटं मोदींनी जंगलाचा फेरफटका मारला. जंगल सफारीनंतर मोदी छत्तीसगड स्थापना दिवसाच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.
यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली. अटलजींमुळे छत्तीसगड भेट स्वरुपात मिळाल्याचं मोदींनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement