एक्स्प्लोर

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कधी संपणार?

नवी दिल्ली : नोटाबंदीला 50 दिवस पूर्ण होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र एटीएमसमोर लागलेल्या रांगा कमी कधी होणार, आणि नियमित पैसे काढण्याची मर्यादा कधी संपणार, हा सर्वांना पडलेला मोठा प्रश्न आहे. एटीएममधून सध्या दररोज 2500 रुपये काढता येतात. एटीएममधून नागरिकांना गरजेप्रमाणे पैसे काढता आले, तर स्वाभाविकपणे एटीएमसमोरच्या रांगाही संपतील. मात्र एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा संपण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिना जाऊ शकतो, असा अंदाज देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्तवला आहे. एटीएमबाहेर रांगा दिसणं सध्या सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र एसबीआयने या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी एक अंदाज बांधला आहे. नोटा छापणाऱ्या आणि ग्राहकांना पैसे देणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडियाचा गेल्या सहा वर्षांचा डेटा एसबीआयने जमा केला आहे. एसबीआयचा अंदाज... एका व्यक्तीला एका महिन्याला किमान किती पैसे लागतात, याचा अंदाज रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या माहितीतून एसबीआय बांधणार आहे. आकडेवारीनुसार एक व्यक्ती सरासरी 3 हजार 143 रुपये महिन्याला काढतो. म्हणजेच एका व्यक्तीला दररोजच्या सरासरी हिशोबाने 103 रुपये लागतात. देशात सध्या 77 कोटी एटीएम कार्ड आहेत. म्हणजेच सध्या देशात दररोज 8 हजार कोटी रुपयांची गरज आहे. एवढी रक्कम दररोज एटीएममध्ये उपलब्ध असेल तरच रांगा लागणं बंद होईल. देशात एकूण 2 लाख 16 हजार 216 एटीएम मशिन्स आहेत. म्हणजेच प्रत्येक एटीएमला दररोज 3 लाख 70 हजार रुपयांची गरज आहे. किमान जानेवारीपर्यंत सरकार अडीच हजार रुपये काढण्याची मर्यादा हटवणार नाही, असा एसबीआयचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत कोंबलं, प्रियांका गांधींही ताब्यात, दिल्लीत प्रचंड राडा
हात-पाय धरून उचललं, राहुल गांधींना पुन्हा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं, ठिय्या मांडलेल्या खासदारांनाही बाजूला केलं, दिल्लीत पुन्हा राडा
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget