एक्स्प्लोर
Advertisement
सिनेमा, गाणी, रंग, खेळ, कवी... वाजपेयींच्या आवडी-निवडी काय होत्या?
राजकारणातील लोकप्रिय नेता, प्रसिद्ध कवी यासोबतच अटल बिहारी वाजपेयी यांच्या अनेक आवडी-निवडी होत्या. फुटबॉल, हॉकी या खेळांपासून ते अगदी सिनेमे पाहण्यापर्यंत त्यांना विविध क्षेत्रातील गोष्टी आवडत.
नवी दिल्ली : राजकारणातील लोकप्रिय नेता, प्रसिद्ध कवी यासोबतच अटल बिहारी वाजपेयी यांच्या अनेक आवडी-निवडी होत्या. फुटबॉल, हॉकी या खेळांपासून ते अगदी सिनेमे पाहण्यापर्यंत त्यांना विविध क्षेत्रातील गोष्टी आवडत. वाजपेयींनी वैयक्तिक जीवनातील आवडी-निवडीविषयी एकदा त्यांनी स्वत:च सांगितल्या होत्या.
आयुष्याचं ध्येय – आपल्या आयुष्याच्या ध्येयाबद्दल सांगताना अटलजी एकदा म्हणाले होते, “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरील माझ्या वाट्याच्या जबाबदाऱ्या मला अत्यंत गंभीरपणे निभावायच्या आहेत. भारताला महान देश म्हणून पाहायचं आहे.”
दु:खद प्रसंग – “वडिलांचं निधन हे माझ्यासाठी सर्वात दु:खद होतं.” असे आयुष्यातील सर्वात दु:खद प्रसंग सांगताना वाजपेयी म्हणाले होते.
जवळचा मित्र – लालकृष्ण आडवाणी, भैरवसिंह शेखावत, एन. एम. घटाटे, जसवंत सिंह, मुकुंद मोदी हे अटल बिहारी वाजपेयींचे जवळचे मित्र होते.
आवडता पोषाख – धोतर-कुर्ता हा पोषाख वाजपेयींना आडत असे. मात्र काही खास प्रसंगी वाजपेयी पठाणी सूट परिधान करत असत.
आवडता रंग – निळा रंग आपला आवडता असल्याचे वाजपेयी सांगत.
आवडती जागा – वाजपेयींनी मनाली, अल्मोडा आणि माऊंट आबू ही ठिकाणं आवडत असत.
आवडते पदार्थ – मासे, चायनीज, खिचडी, खीर आणि मालपुआ हे वाजपेयींचे आवडते पदार्थ होते.
खाण्यासाठी दिल्लीतील आवडती जागा – पराठा गल्ली, सागर आणि चुंगवा ही दिल्लीतील ठिकाणं वाजपेयी खाण्यासाठी निवडत असत.
आवडतं गाणं आणि वाद्य – भीमसेन जोशी, अमजद अली खान (सरोद वादक) आणि हरिप्रसाद चौरसिया (बासरी वादक) हे वाजपेयींचे आवडते गायक, वादक होते.
आवडतं गाणं – एस डी बर्मन यांचं ‘ओ.. मांझी रे..’ आणि मुकेश-लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘कभी कभी मेरे दिल में’ ही गाणी वाजपेयींना आवडायची.
आवडते गायक-गायिका – लता मंगेशकर, मुकेश आणि मोहम्मद रफी
आवडते सिनेमे – देवदास, बंदिनी आणि तिसरी कसम
आवडते इंग्रजी सिनेमे – ब्राईड ओव्हर रिव्हर कवाई, बॉर्न फ्री आणि गांधी
आवडते कवी – सूर्यकांत त्रिपाठी निराला, बाल कृष्ण शर्मा नवीन, जगन्नाथ प्रसाद मिलिंद, फैज
आवडते खेळ – हॉकी, फुटबॉल
अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement