एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 35A काय आहे?

या कलमाविरोधात सुप्रीम कोर्टात चार याचिका प्रलंबित आहेत. आतापर्यंत यावर सुनावणी वेळोवेळी पुढे ढकलली आहे. समानतेच्या अधिकारांचं यामुळे उल्लंघन होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातील कलम 35A च्या विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. या याचिका सध्या प्रलंबित आहेत. यावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होत आहे. मात्र त्यापूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. काय आहे प्रकरण? कोर्टात प्रलंबित असलेल्या याचिकांमध्ये राज्यघटनेतील कलम 35A रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरुन येणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी, शिक्षण आणि सुविधांपासून वंचित ठेवलं जातं. सोबतच, राज्याच्या बाहेरील व्यक्तीसोबत लग्न केल्यास मुलगीही आवश्यक अधिकार गमावते. राष्ट्रपतींच्या आदेशाने 35A चा समावेश तत्कालीन राष्ट्रपतींच्या आदेशाने मे 1954 मध्ये कलम 35A चा राज्यघटनेत समावेश करण्यात आला. राज्यातील नागरिकांची परिभाषा ठरवण्याचा अधिकार जम्मू-काश्मीर विधानसभेला यामुळे मिळाला. याच नागरिकांना संपत्ती ठेवणं, सरकारी नोकरी मिळवणं आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळतो. संसदेत प्रस्ताव आणल्याविनाच या कलमाचा राज्यघटनेत समावेश का केला, असा याचिकाकर्त्यांचा प्रश्न आहे. या आधारावर सुप्रीम कोर्टाने कलम 35A रद्द करावं, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. एकूण चार याचिका प्रलंबित 35A रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात चार याचिका प्रलंबित आहेत. यामध्ये दोन याचिका वुई द सिटीझन आणि पश्चिम पाकिस्तान निर्वासीत कृती समिती या संस्थांच्या नावाने दाखल आहेत. यामध्ये राज्यात बाहेरुन येणाऱ्या लोकांच्या समस्यांवर बोट ठेवण्यात आलं आहे. इतर दोन याचिका चारु वली खन्ना आणि सीमा राजदान भार्गव नावाच्या महिलांनी केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील बाहेरच्या पुरुषासोबत लग्न केल्यास होणाऱ्या भेदभावाचा मुद्दा या महिलांनी आपल्या याचिकांमधून मांडला आहे. त्यांनी घटनेतील कलम 14 म्हणजेच समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचंही म्हटलं आहे. काश्मीरी मुलीसोबत लग्न केल्यास बाहेरच्या पुरुषांच्या मुलांना स्थायी नागरिकत्वाचा दर्जा आणि अनेक अधिकार मिळतात. मात्र राज्यातील बाहेरच्या पुरुषासोबत लग्न केल्यास महिलांच्या अधिकारांवर बंदी घालण्यात आली आहे, असं याचिकाकर्त्या महिलांचं म्हणणं आहे. आतापर्यंत दोन वेळा सुनावणी पुढे ढकलली केंद्र सरकारने आयबीचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांचा काश्मीरप्रश्नी मध्यस्थी नियुक्त केलं आहे. सरकारने आतापर्यंत दोन वेळा याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यासाठी विनंती केली आहे. या सुनावणीमुळे शांतता प्रस्थापित करण्यात अडचणी येतील, असं सरकारचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Embed widget