एक्स्प्लोर

Today In History : क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती, इतिहासात आज

3th August 2023 Important Events : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते.

What Happened on August 3rd This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे तीन ऑगस्ट रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1900 मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म झाला होता. त्याशिवाय भारतीय फूटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याचाही जन्म आजच्याच दिवशी झाला.  याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

1900  : क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म

स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म आजच्याच दिवशी 1900 मध्ये सांगलीत झाला होता. क्रांतिसिंह नाना पाटील हे भारताचे स्वातंत्र्यसैनिक आणि संसदपटू होते. त्यांना 'क्रांतिसिंह' म्हणून ओळखले जात असे. ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देत त्यांनी 1940  मध्ये सातारा जिल्ह्यात ‘प्रति सरकार’ नावाचे स्वतंत्र सरकार स्थापन केले होते. 6 डिसेंबर 1976 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

1984 : भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री याचा जन्म

फुटबॉलपटू सुनील छेत्री याचा जन्म 3 ऑगस्ट 1984 रोजी झाला. स्ट्रायकर किंवा विंगर म्हणून सुनील छेत्री याला ओळखले जाते. तो इंडियन सुपर लीग क्लब बेंगळुरू एफसी आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. कॅप्टन फॅन्टास्टिक म्हणून प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये तो  रोनाल्डोनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्री याला पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्नसारख्या  पुरस्कारांनी गौरविले आहे. 

1960 : भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म

गोपाल शर्मा  यांना स्वतंत्र भारतात उत्तर प्रदेशकडून टीम इंडियामध्ये खेळणाऱ्या पहिला खेळाडू म्हणून ओळखले जाते.  गोपाल शर्मा यांचा जन्म 3 ऑगस्ट 1960 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात झाला. ऑफस्पिनर गोपालने टीम इंडियासाठी पाच कसोटी आणि 11 एकदिवसीय सामने खेळले. तो भारतासाठी आणखी सामने खेळू शकला असता, पण टीम इंडियाचे आणखी सहा खेळाडू त्याच्या मार्गात उभे राहिले. यामध्ये लक्ष्मण शिवरामकृष्णन, मनिंदर सिंग, अर्शद अयुब, शिवलाल यादव, रवी शास्त्री आणि नरेंद्र हिरवाणी यांचा समावेश होता. या दिग्गजांसह टीम इंडियात आपले स्थान पक्के करणे गोपाल शर्मासाठी सोपे नव्हते.  

1956 : भारतीय क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू  यांचा जन्म

मध्यमगती गोलंदाज बलविंदर सिंग संधूची क्रिकेट कारकीर्द खूपच कमी होती. पण 36 वर्षांपूर्वी भारताच्या विश्वचषक विजयात त्यांचे योगदान आजही थक्क करणारे आहे. 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात समाविष्ट झालेल्या संधूने आपल्या गोलंदाजीने भारताचा विजय सोपा केला होता. अंतिम सामन्यात संधूने 184 धावांच्या छोट्या लक्ष्याचा बचाव करताना इंडीज संघाचा सलामीवीर गॉर्डन ग्रीनिज (1 धाव) याला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. खरं तर, त्या सामन्यात भारताला लवकर यश मिळवण्याची गरज होती, जी संधूने पूर्ण केली. 

इतर महत्वाच्या घटना

1898 :  आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म

1939 : भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म 

1924  : अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्म

1916 : शकील बदायूँनी - गीतकार आणि शायर यांचा जन्म

1886 : हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म 

2007 : लेखिका   सरोजिनी वैद्य यांचे निधन
 
1993 : अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन 

1930 : आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन 

1929 : ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन

1881 : अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचे निधन 

2004 : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अमेरिका - 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले.

2000: शाजी एन. करुण - मल्याळी दिग्दर्शक, यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.

1997 : स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड - या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंगइमारतीचे उदघाटन.

1994 : संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

1977 : TRS-80 कॉम्पुटर - टँडी कॉर्पोरेशन कपंनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकांची घोषणा केली.

1960 : नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

1949 : नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन - बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलीनीकरण करून या असोसिएशनची स्थापन.

1948 : भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.

1940 : दुसरे महायुद्ध - इटालियन सैन्याने ब्रिटीश सोमालीलँडवर आक्रमण सुरू केले.

1936 : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.

1914 : एडॉल्फ हिटलर याने बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडेस्वतःला सैन्यात दाखल करून घ्यावे असा अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली.

1914 : पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध घोषित केले, तर रोमानियाने आपली तटस्थता जाहीर केली.

1900 : द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी स्थापन झाली.

1859 : अमेरिकन डेंटल असोसिएशनची स्थापना न्यूयॉर्क, अमेरिका येथे झाली.

1811 : जंगफ्राऊ शिखर या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई केली.

1783 : माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे 35 हजार लोकांचे निधन

1046 : सांताक्लॉज लँड, थीम पार्क - जगातील पहिले थीम पार्क सांताक्लॉज, इंडियाना, अमेरिका येथे उघडले. 

1996 : भारतीय टेनिसपटू लिअँडर पेस याने अटलांटामधील शतकमहोत्सवी ऑलिंपिक स्पर्धेत ब्रॉँझपदक मिळविले.

2012 : लंडन ऑलिंपिकमध्ये विजयकुमारने मीटर रॅपिड फायर नेमबाजीमध्ये भारताचे पहिले रौप्यपदक जिंकण्याचा मान मिळविला.

2017 : जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम मंजू कुमारीने केला. तिने मुलींच्या किलो गटात ही कामगिरी केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget