Wrestler Protest: "शाहीनबागेत जी फौज होती, तीच..."; कुस्तीपटूंच्या आंदोलनावर ब्रिजभूषण सिंह यांची परखड शब्दांत टिका
Wrestler Protest: ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाची तुलना शाहीन बागशी केली आहे. तसेच, अनेक गंभीर आरोपही केले आहेत.
Wrestler Protest In Jantar Mantar: रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोध कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन पुकारलं आहे. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तसेच, ब्रिजभूषण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कुस्तीपटूंकडून सातत्यानं होत आहे. अशातच आता ब्रिजभूषण यांनीही या सर्व प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यात ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाची तुलना शाहीन बागशी केली आहे. तसेच, अनेक गंभीर आरोपही केले आहेत.
ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सोमवारी (1 मे) बोलताना म्हटलंय की, "माझ्या पक्षानं मला राजीनामा देण्यास सांगितलं तर मी राजीनामा देईन... 'तुकडे तुकडे गँग', शाहीन बाग, 'किसान आंदोलन'मध्ये सामील असलेल्या फौजांचं खरं लक्ष्य मी नसून पक्ष (भाजप) त्यांचं खरं लक्ष्य आहे. या खेळाडूंना पैसे दिले जातात."
#WATCH | If my party asks me to resign, I will resign...Forces involved in 'Tukde Tukde gang', Shaheen Bagh, 'Kisaan Andolan' seem to be involved in it (Wrestlers' protest), I am not their target, party (BJP ) is their target, these athletes are paid. Protest is expanding like… pic.twitter.com/AUzVGnk39V
— ANI (@ANI) May 1, 2023
यूपी आणि हरियाणाचे विभाजन करायचंय : ब्रिजभूषण सिंह
ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, शाहीनबागप्रमाणे विरोध वाढत आहे, त्यांना यूपी आणि हरियाणाचं विभाजन करायचं आहे. हेच लोक पंतप्रधान मोदींना शिव्या देतात. यामागे उद्योगपती आहेत, या आंदोलन करणाऱ्या खेळाडूंनाही पगार दिला जातोय. उद्योगपतींचा पैसा यात गुंतला आहे.
मी काय चूक केलीये? : ब्रिजभूषण सिंह
खासदार ब्रिजभूषण सिंह पुढे बोलताना म्हणाले की, मी कोणती चूक केली आहे की, त्यासाठी मी राजीनामा द्यावा? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर झाला, आता तपास होऊ द्या, माझ्यावर कोणते आरोप आहेत, हे मलाही माहित नाही. चार महिने विचार केल्यानंतर माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
7 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केलेत
7 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. एबीपी न्यूजला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत ब्रिज भूषण यांनी आपल्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांना उत्तर देताना सांगितलं की, केवळ लैंगिक छळाच्या आरोपांमुळे मी राजीनामा देणार नाही. मी कोणताही लैंगिक छळ केलेला नाही. जर सर्व खेळाडू जंतरमंतरहून परतले तर त्यांचा राजीनामा तयार आहे. तसेच, ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंचं आंदोलन राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलं असून आपण कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यास तयार असल्याचं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :