(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर उसळला हिंसाचार, 10 जणांना जिवंत जाळलं
West Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर टीएमसी कार्यकर्ते संतप्त झाल्यानंतर परिसरात हिंसाचार पसरला. कथितपणे संतप्त जमावाने 10-12 घरे दरवाजे बंद करून पेटवून दिली.
West Bengal Violence : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर टीएमसी कार्यकर्ते संतप्त झाले आणि परिसरात हिंसाचार पसरला. कथितपणे संतप्त जमावाने 10-12 घरांचे दरवाजे बंद करून त्यांना आग लावली. या आगीत 10 जण जिवंत जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. यामध्ये 10-12 घरे जळाली आहेत. एकूण 10 लोकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकाच घरातून 7 लोकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. कथितपणे रामपूरहाटमध्ये तृणमूल काँग्रेस नेत्याच्या हत्येनंतर जमावाकडून घरे पेटवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
घटना कल रात की है,10-12 घर थे जो जल चुके हैं, कुल 10 लोगों की मृत्यु हुई है जिनकी बॉडी रिकवर की गई है। एक ही घर से 7 लोगों के शव निकाले गए हैं: रामपुरहाट में तृणमूल नेता की हत्या के बाद कथित रूप से भीड़ द्वारा घरों में आग लगाने से कई लोगों की मृत्यु पर दमकल अधिकारी, बीरभूम pic.twitter.com/66ptPD3NXK
— ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2022
स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण राजकीय वैरातून झाल्याचे दिसून येत आहे.
सोमवार रात्रीची घटना
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अग्निशमन विभागाला सोमवारी रात्री जाळपोळ झाल्याची माहिती मिळाली होती. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा 10-12 घरे जळाली होती. आतापर्यंत एकूण 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
हिंसाचारामागील कारण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यात आला. भादू यांच्या मृत्यूनंतर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले. यानंतर त्यांच्या समर्थकांनी संशयितांच्या घरांना आग लावली. पोलीसही याला राजकीय शत्रुत्वातून झालेले प्रकरण असल्याचं म्हणत आहेत. मात्र आजूबाजूच्या परिसरातील तणावपूर्ण वातावरण पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Plane Crash in China : चीनमधील विमान अपघातानंतर भारत सर्तक, डीजीसीएचा बोईंग विमानांवर पाळत ठेवण्याचा निर्णय
- Petrol Diesel Price : खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेल महागलं, 137 दिवसांनंतर इंधन दरवाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha