Weather Update : थर्टी फर्स्टवर पावसाचं सावट! नवीन वर्षातही पावसाची शक्यता
IMD Forecast : आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, राजस्थानसह तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Weather Update Today : थर्टी फर्स्टला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशातील काही भागात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता (Rain Update) वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात तापमानात (Temperature) आणखी घट होणार आहे. देशाच्या उत्तरेकडे सध्या थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. आयएमडीने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, राजस्थानसह तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अनेक भागात दाट धुक्याची चादर
भारतीय हवामान विभागाने (IMD) वायव्य आणि मध्य भारतातील अनेक भागात दाट धुके राहील, असा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत पूर्व भारतातही धुक्याची चादर पसरू शकते. पुढील दोन दिवसांत मध्य आणि वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात आजचं हवामान कसं असेल?
देशात सध्या तापमानात घट झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील हवामानावरही बदल झाला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील हवामानात चांगलाच गारठा जाणवत होता. दरम्यान, नाताळनंतर राज्यातील तापमानात किंचित वाढ झाली आहे. येत्या 48 तासांत वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
हवामानात बदल होण्याची शक्यता
आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, पश्चिमेकडून येणाऱ्या हवामानात थोडासा (Weather Change) बदल झाल्यामुळे शनिवार आणि रविवारी जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir), लडाख (Ladakh), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttrakhand) हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी 1 जानेवारी पर्यंत संध्याकाळी उशिरा आणि सकाळी खूप दाट धुके पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील 48 तासात पावसाचा अंदाज
दरम्यान, 31 डिसेंबरपासून पुढील 48 तास देशात पाऊस (Rain Alert) पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंद महासागर (0 आणि आग्नेय अरबी समुद्रावर (Areabian Sea) तयार होत असलेल्या बाष्पाच्या ढगांमुळे (Cloud) राज्यासह देशाच्या हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 3 जानेवारीपर्यंत दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाजन हवामान खात्याने वर्तवला आहे. तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात. दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात शनिवारी मुसळधार पाऊस पडू शकतो.