(Source: Poll of Polls)
Dr. Chandra Sekhar Pemmasani : 5 हजार कोटींचा मालक, पहिल्यांदा खासदार अन् आता थेट मंत्री; एनडीएमधील किंगमेकर टीडीपीचे चंद्रशेखर आहेत तरी कोण?
Dr. Chandra Sekhar Pemmasani : चंद्रशेखर पेम्मासानी यांनी पोन्नूरमधील विद्यमान वायएसआरसीपी आमदार किलारी वेंकट रोसैया यांचा गुटूर जागेवर सुमारे साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता.
Chandra Sekhar Pemmasani : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अनेक नवीन मंत्र्यांना संधी मिळत आहे. कारण भाजप आपल्या मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करत आहे. आंध्र प्रदेशात 16 जागा जिंकणारे TDP चे दोन खासदार देखील मंत्री म्हणून शपथ घेतील, त्यापैकी श्रीकाकुलमचे खासदार राम मोहन नायडू आणि गुंटूरचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी हे मंत्री म्हणून शपथ घेतील.
एकूण संपत्ती 5705 कोटी रुपये
चंद्रशेखर पेम्मासानी यांनी पोन्नूरमधील विद्यमान वायएसआरसीपी आमदार किलारी वेंकट रोसैया यांचा गुटूर जागेवर सुमारे साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता. चंद्रशेखर यांना 8 लाख 64 हजार 948 मते मिळाली होती, तर व्यंकट रोसय्या यांना 5 लाख 20 हजार 253 मते मिळाली होती. पेम्मासानी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 5705 कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ते सर्वात श्रीमंत उमेदवार होते.
पेम्मासानी यांनी 1999 मध्ये एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमधून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर, 2005 मध्ये, त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील गेसिंजर मेडिकल सेंटरमधून इंटर्नल मेडिसिनमध्ये एमडी पदवी प्राप्त केली. परदेशात राहूनही पेमसानी यांनी गुटूर यांच्याशी संबंध ठेवले. आता निवडून येत एनडीए सरकारमध्ये मंत्री होत आहेत. पेम्मासानी यांनी अलीकडेच राजकारणात प्रवेश केला असे नाही, ते अनेक दिवसांपासून टीडीपीच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.
टेस्ला आणि रोल्स रॉयल या दोन मर्सिडीजचे मालक
राजकारणाव्यतिरिक्त उद्योजकतेसाठी ते ओळखले जातात. तसेच Uworld चे संस्थापक आणि CEO आहेत. हा एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म असून ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत केली आहे. 2020 मध्ये अर्न्स्ट आणि यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्कार जिंकल्यावर त्यांना ओळख मिळाली. भारत आणि अमेरिकेतील 100 हून अधिक कंपन्या आणि मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याने डॉ. पेम्मासानी यांची संपत्ती आश्चर्यकारक आहे. त्याच्या जंगम मालमत्तेत दोन मर्सिडीज कार, एक टेस्ला आणि एक रोल्स रॉयल यांचा समावेश आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
लोकसभा निवडणुकीत भाजपला 240, काँग्रेसला 99, समाजवादी पक्षाला 37, तृणमूल काँग्रेसला 29, द्रमुकला 22, टीडीपीला 16, जेडीयूला 12, शिवसेना (यूबीटी) 9, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 8, शिवसेना 8 जागा मिळतील. 7, LJP रामविलास 5, YSRCP 4, RJD 4, CPIM 4, IUML-AAP-JMM यांना 3-3-3 जागा मिळाल्या. याशिवाय पवन कल्याणच्या जनसेना, CPIML, JDUS, RLD, JKN यांना 2-2-2-2-2 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काही पक्षांचे प्रत्येकी एक तर 7 अपक्ष विजयी झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या