एक्स्प्लोर
Advertisement
केजरीवालांचा पंतप्रधान मोदींना सॅल्युट
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सॅल्युट केला आहे.
भारतीय जवानांनी LOC वर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. मोदींनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीबद्दल केजरीवालांनी त्यांना सॅल्युट केला आहे.
भारतीय जवानांनी 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री सीमेजवळ सर्जिकल स्ट्राईक करुन सुमारे 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराने तसा दावा केला आहे.
दुसरीकडे पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कराने भारताचा हा दावा सातत्याने फेटाळून लावला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केला नाही, तर नियंत्रण रेषेवर चकमक झाली, असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे.
केजरीवाल यांनी व्हिडीओ संदेश जारी केला आहे. "आपल्या पंतप्रधानांशी 100 मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, मात्र पंतप्रधानांनी जी इच्छाशक्ती दाखवली आहे, त्याबद्दल मी त्यांना सॅल्युट करतो", असं केजरीवालांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे केजरीवालांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला आहे. "भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. आता पाकिस्तान जागतिक मीडियात खोट्या बातम्या पसरवत आहे. इतकंच नाही तर बॉर्डरवर पत्रकारांना नेऊन, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे" असंही केजरीवालांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी पाकिस्तानचा हा खोटा दावा खोडून काढावा, असंही आवाहन केजरीवालांनी केलं आहे.
केजरीवाल म्हणाले, "मी पंतप्रधानांना आवाहन करतो की, जसं जमिनीवरुन पाकिस्तानला उत्तर दिलं, तसंच पाकिस्तानच्या या खोट्या प्रचाराचाही पर्दाफाश करावा. आम्ही तुमच्या सोबत आहोत"
As we fight Pakistan on Ground, we must fight their propaganda as well.
Watch @ArvindKejriwal's appeal to Modi ji. #AKBacksModiOnPak pic.twitter.com/Y7oJGZVzk6 — AAP ???????? (@AamAadmiParty) October 3, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement