एक्स्प्लोर

WB Election 2021 : सोशल मीडियाच्या युगात मोदी विरुद्ध दिदी लढाई भिंतीचित्रावरही!

WB Election 2021 : सध्या कोलकात्यातील रस्ते आणि भिंती आपल्याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हसर्‍या चित्रांनी भरलेले दिसून आहेत. ममता बॅनर्जी यांच्या आक्रमक निवडणूक प्रचाराचा अंदाज या भिंतीचित्राच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो.  

कोलकाता : सोशल मीडियाच्या युगात प्रचाराच्या पद्धती कदाचित आधुनिक झाल्या असतील पण पश्चिम बंगालमध्ये आजही राजकीय पक्ष जुन्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. देशातील सर्वात जुन्या महानगरांपैकी एक कोलकाता. जिथे पाहाल तेथे रस्त्यांच्या कडेला असलेल्या भिंतींवर चित्रांद्वारे प्रचार पहायला मिळतो. कोलकात्यामध्ये भिंतींवर केलेल्या चित्रांच्या माध्यमातून राजकीय प्रचार बऱ्याच प्रमाणात दिसून येतो.  
 
कोलकाता शहरात तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते  भिंतीवर ब्रशपेंटिंग तयार करताना दिसून आले.  यामध्ये केवळ निवडणूक चिन्ह किंवा उमेदवाराचे नावच नाही तर बरीच व्यंगचित्रे बनवून लोकांना त्यांच्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  यामध्ये ममता दिदींची टीएमसी अग्रस्थानी दिसून येत आहे. कोलकातासह राज्यातील इतर शहरांमध्ये वॉल पेंटिंगबरोबरच फ्लेक्स आणि पोस्टर्स दिसून येतात.

सर्वाधिक भिंतीचित्र ही  कोलकात्यामधील टांग्रा परिसरात दिसून येतात ज्याला चायना टाऊन म्हणून ओळखले जाते.  इथे चीनी मूळचे लोक येथे स्थायिक झाले आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी चीनमधून बंगालमध्ये स्थायिक झालेल्या लोकांनी येथे आपले घर केले आणि कालांतराने ते कोलकात्याचे नागरिकही झाले.  आता हे सर्व लोक मतदार आहेत आणि त्यांची मते मिळविण्यासाठी भिंतींवर चिनी भाषेत घोषणा लिहिलेल्या आहेत. 

कोलकात्यामध्ये बनविलेल्या वॉल पेंटिंगमध्ये व्यंगचित्रांचा वापर देखील केला गेला आहे.  या व्यंगचित्रांमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्याविरूद्ध टीका, कोरोना काळातील लॉकडाउन, अनेक दुर्घटना, महागाई, काळा पैसा, अर्थव्यवस्था यांवर भाष्य केलं आहे. 


WB Election 2021 : सोशल मीडियाच्या युगात मोदी विरुद्ध दिदी लढाई भिंतीचित्रावरही!

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळातील कर्तृत्वही भिंतीवरील पेंटिंगच्या माध्यमातून दर्शवण्यात आलं आहे. ममता दिदींच्या कार्यकाळात लोकांना विविध योजनांमधून काय फायदा दिला जात आहे हे यातून दाखवलं आहे.  आरोग्य सुविधा, विधवा पेन्शन, कन्या योजना, मोफत रेशन, विवाह योजना, विद्यार्थ्यांसाठी सायकल योजना अशा योजनांचा उल्लेखही यात दिसतो.

आम्ही जेव्हा भिंतीवर चित्र काढत असलेल्या एका व्यक्तिला बोललो त्यावेळी त्याने सांगितलं की, त्याला प्रति चित्राला त्याला 500 रुपये दिले जातात.  टीएमसी कार्यकर्त्याने सांगितले की, कुणाचंही भांडण होऊ नये म्हणून भिंतीवर पेंटिंग करण्यापूर्वी परवानगी घेतली जाते.  


WB Election 2021 : सोशल मीडियाच्या युगात मोदी विरुद्ध दिदी लढाई भिंतीचित्रावरही!

सध्या कोलकात्यातील रस्ते आणि भिंती आपल्याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हसर्‍या चित्रांनी भरलेले दिसून आहेत. ममता बॅनर्जी यांच्या आक्रमक निवडणूक प्रचाराचा अंदाज या भिंतीचित्राच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Budget 2025 :  रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Embed widget