एक्स्प्लोर
विरेंद्र सहवाग शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उलचणार
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. माजी क्रिकेटर विरेंद्र सहवागने शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याचे जाहीर केले आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर सरकारसह अनेक सामाजिक संस्था जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सहवागही शहीदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. सहवागने शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याचे जाहीर केले आहे.
सहवागने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भातली घोषणा केली आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची माझी तयारी आहे. या मुलांना जर मी माझ्या स्वतःच्या शाळेत शिक्षण देऊ शकलो तर हे माझं सौभाग्य असेल.
दरम्यान, शहीद झालेल्या प्रत्येक जवानांच्या कुटुंबीयांना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "या हल्ल्यात 49 जवान शहीद झाले आहेत. प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख असे एकूण अडीच कोटी रुपये दिले जाणार आहेत."
Nothing we can do will be enough, but the least I can do is offer to take complete care of the education of the children of our brave CRPF jawans martyred in #Pulwama in my Sehwag International School @SehwagSchool , Jhajjar. Saubhagya hoga ???? pic.twitter.com/lpRcJSmwUh
— Virender Sehwag (@virendersehwag) February 16, 2019
Unbearable pain. #StandWithForces pic.twitter.com/9tiYcwb39P
— Virender Sehwag (@virendersehwag) February 15, 2019
संबधित बातम्या : Pulwama terror attack : प्रत्येक शहीदाच्या कुटुंबीयांना अमिताभ बच्चन देणार 5 लाख रुपये Pulwama terror attack : दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जबाबदार : आझम खान Pulwama terror attack : भारताचे जवान गुन्हेगारांना शिक्षा देतील, थोडं थांबा : नरेंद्र मोदीReally pained by the cowardly attack on our CRPF in J&K in which our brave men have been martyred . No words are enough to describe the pain. I wish a speedy recovery to those injured.#SudharJaaoWarnaSudhaarDenge
— Virender Sehwag (@virendersehwag) February 14, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement