तीन महागड्या गाड्या, हरियाणात आलिशान घर, काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या विनेश फोगाटची संपत्ती नेमकी किती?
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तिच्यासोबत भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेदेखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
मुंबई : अख्ख्या भारताची मान उचावणारी कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat Joins Congress) हिने मोठा निर्णय घेतला आहे. विनेशने कुस्तीला याआधीच रामराम ठोकला होता. त्यानंतर ती पुढे काय करणा? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता तिने थेट राजकारणात उडी घेतली आहे. तिने आज (6 सप्टेंबर) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. विनेशसोबत भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कुस्ताच्या मैदानात अनेकांना चीत करणारी विनेश आता राजकारणाच्या फडात विजयी कामगिरी करणार का? अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून कुस्तीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या विनेशच्या या निर्णयामुळे तिच्या संपत्तीची चर्चा होत आहे. विनेशकडे एकूण किती संपत्ती आहे? असे विचारले जात आहे.
विनेश रेल्वे खात्यात होती नोकरीवर
विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी आपल्या रेल्वे अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामाच्या अर्जावर वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देत आहे, असं विनेश फोगाटने नमूद केलं आहे. विनेश फोगाट उत्तर रेल्वेमध्ये OSD या पदावर तैनात होती. रेल्वेत सेवा करत असतानाचा काळ हा सर्वाधिक स्मरणीय आणि गौरवपूर्ण होता. मी रेल्वे परिवाराचे आभार मानते, अशा भावना विनेश फोगाटने व्यक्त केल्या.
विनेश आणि बजरंग यांनी राहुल गांधींची घेतली होती भेट
विनेश फोगाटने आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी विनेश आणि बजरंग पुनिया यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. विनेश फोगाट काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
चक दे इंडिया, चक दे हरियाणा!
— Mallikarjun Kharge (@kharge) September 6, 2024
दुनिया में भारत का नाम रौशन करने वाले हमारे प्रतिभाशाली चैंपियन विनेश फोगाट और बजरंग पुनिया से 10 राजाजी मार्ग पर मुलाक़ात।
हमें आप दोनों पर गर्व है। pic.twitter.com/aFRwfFeeo1
विनेश फोगाटची संपत्ती किती?
रेल्वेत नोकरीवर असताना विनेश फोगाटला प्रतिमहिना 1 लाख रुपयांपेक्षा अधिक पगार मिळायचा. विनेश फोगाटजवळ तीन महागड्या गाड्या आहेत. यामध्ये टोयोटो फॉर्च्यूनर, टोयोटा इनोव्हा, मर्सिडिज बेंझ जीएलई या कारचा समावेश आहे. मर्सिडिज बेंज जीएलई या कारची किंमत 1.8 कोटी रुपये आहे.
हरियाणात आलिशान बंगला
एका रिपोर्टनुसार विनेश फोगाटच्या एकूण संपत्तीचे मूल्य हे 36.5 कोटी रुपये आहे. विनेशने ही कमाई वेगवेगळ्या स्त्रोतांच्या माध्यमातून केलेली आहे. केंद्रीय खेळ मंत्रालयाकडून विनेश फोगाटला वेतन म्हणून प्रतिमहिना साधारण 6 लाख रुपये मिळायचे. बेसलाई व्हेंचर्स आणि कॉर्नरस्टोन स्पोर्ट यासारख्या कपन्यांची विनेश सदिच्छादूत आहे. विनेश फोगाटकडे हरियाणात कोट्यवधी किमतीचे एक आलिशान घर आहे.
हेही वाचा :
यशस्वी जैस्वालच्या फोटोची सोशल मीडियावर पुन्हा रंगली चर्चा; कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?