एक्स्प्लोर
कर्जबुडव्या विजय मल्ल्याची भारत-पाक सामन्याला उपस्थिती
बर्मिंगहॅम : भारतीय बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून पलायन केलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याची लंडनमध्ये चांगलीच चंगळ सुरु आहे. इंग्लंडच्या एजबस्टन स्टेडियममध्ये सुरू असलेला भारत आणि पाकिस्तानमधला हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी चक्क विजय मल्ल्या स्टेडियममध्ये हजर आहे.
देशभरातील प्रमुख बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे. त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
त्याला स्कॉटलंड पोलिसांनीही काही दिवसांपूर्वी अटक केली होती. पण काही तासातच त्याला जामीन मिळाला होता. पण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनिमित्त तो एजबस्टन मैदानात प्रेक्षकांमध्ये बसल्याचं कॅमेऱ्यानं टिपलं आहे.
विशेष म्हणजे, यावेळी त्याची सुनील गावस्कर यांनीही भेट घेतली. त्याचे फोटो ट्विटरवर ट्रोल होत आहेत. त्यामुळे कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अजूनही व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत, असल्याचं दिसून येत आहे.Bhai ye dekh feku se Roz baat hoti h apun ki 😜😜👇👇 @bishnoikuldeep #VijayMallya #IndVsPak pic.twitter.com/sodrvhrR8c
— Aryan Saini (@AryanSa92289113) June 4, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement