B Sudarshan Reddy : निकाल स्वीकारला, लोकशाही फक्त विजयानं मजबूत होत नाही तर... पराभवानंतर बी सुदर्शन रेड्डी यांची पहिली प्रतिक्रिया
Vice President Election : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमदेवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. सीपी. राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली. तर, इंडिया आघाडीचे उमदेवार बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली. 15 मतं बाद झाली आहेत, असं राज्यसभा सचिवालयानं जाहीर केलं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल माझ्या बाजूनं आला नसला तरी स्वीकारला असून महत्त्वाच्या उद्देशासाठी संघर्ष सुरुच राहील, असं बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले.
बी. सुदर्शन रेड्डी काय म्हणाले?
आज खासदारांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांचा मताधिकार नोंदवला. निवडणुकीचा जो निकाल लागला आहे तो विनम्रपणे आणि महान गणराज्याच्या लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवत स्वीकारत आहे. संविधानिक नितिमत्ता, न्याय आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या मुल्यांनी माझ्या जीवनात मार्ग दाखवला, त्याच्यावर मी चाललो, त्या मूल्यांसाठी लढण्याची संधी मिला मिळाली. जरी निकाल माझ्या बाजूनं आलेला नसला तरी मोठ्या उद्देशासाठी सामुदायिकपणे लढत राहू. वैचारिक संघर्ष ताकदीनं सुरच राहील.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त उमेदवार म्हणून संधी दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपली लोकशाही फक्त विजयानं मजबूत होत नाही तर संवाद,मतभिन्नता आणि सहभाग यानं मजबूत होते. नागरिक म्हणून आणि समता, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्या आदर्शांचं रक्षण करण्यास कटिब्ध आहे. आपल्या राष्ट्रीय जीवनासाठी संविधान मार्गदर्शन करत राहो.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सीपी राधाकृष्णन यांना शुभेच्छा, त्यांचा कार्यकाळ देशसेवेसाठी यशस्वी ठरो..
बी. सुदर्शन रेड्डी, माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय
STORY | Ideological battle continues with ever greater vigour: Reddy after VP poll defeat
— Press Trust of India (@PTI_News) September 9, 2025
Opposition's vice presidential candidate B Sudershan Reddy Tuesday said he humbly accepts the defeat in the vice presidential polls and asserted that democracy is strengthened not by… pic.twitter.com/2l0Fl3eyzt
सीपी. राधाकृष्णन विजयी
एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे 152 मतांनी विजयी झाले आहेत. ते भारताचे 15 वे उपराष्ट्रपती बनले आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 781 मतदार मतदान करु शकत होते. मात्र 13 खासदारांनी मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानं 767 खासदारांनी मतदान केलं. यापैकी 15 मतं बाद ठरल्यानं 752 खासदारांची मतं मोजण्यात आली. यामध्ये 452 मतं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना मिळाली. तर, 300 मतं बी. सुदर्शन रेड्डी यांना मिळाली.

























