(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandro Tomar Death: 'शूटर दादी' चंद्रो तोमर यांचे निधन, कोरोना विषाणूची झाली होती लागण
उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी ज्येष्ठ शूटर दादी चंद्रो तोमर यांचे मेरठमधील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दादीच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नेमबाज दादी चंद्रो तोमर यांचे मेरठमधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. एका दिवस आधी त्यांना आनंद हॉस्पिटलमधून मेरठच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ज्येष्ठ नेमबाज दादी चंद्रो तोमर याच्या मृत्यू कारण ब्रेन हेम्ब्रेज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान, बॉलिवूड कलाकारांनी दादी चंद्रो यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नेमबाज दादी चंद्रो तोमर यांचा मुलगा विनोद तोमर म्हणला की सोमवारी तिला श्वास घेण्यात त्रास झाला. त्यानंतर चाचणी केली असता तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना मेरठच्या आनंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रात्री प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. चंद्रो तोमर यांचा कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या पाहून त्यांचे चाहते निराश झाले होते. लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा देत होते. मात्र, शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
चंद्रो तोमर यांनी वयाच्या 60 व्या वर्षी शूटिंगमध्ये करिअर केले असून बर्याच राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांच्यावर एक चित्रपटही तयार करण्यात आलाय. चंद्रो तोमर यांना जगातील सर्वात वयस्क नेमबाज मानले जात होते.
बॉलिवूड कलाकारांची श्रद्धांजली
तापसी पन्नू
प्रेरणेसाठी आपण नेहमीच सोबत रहाल..
ज्या मुलींना तुम्ही जगण्याची आशा दिली त्या सर्व मुलींमध्ये तुम्ही जिवंत आहात. माझा क्युटेस्ट रॉकस्टार.. तुम्हाला शांती लाभो
For the inspiration you will always be...
— taapsee pannu (@taapsee) April 30, 2021
You will live on forever in all the girls you gave hope to live. My cutest rockstar May the ✌🏼 and peace be with you ❤️ pic.twitter.com/4823i5jyeP
भूमी पेडणेकर..
चंद्रो दादी यांच्या निधनाच्या बातमीने हादरुन गेलेय. माझा एक भाग निघून गेला आहे असं वाटतंय. तिने स्वतःचे नियम बनवले आणि अनेक मुलींना स्वप्न शोधण्याचा मार्ग मोकळा झाला. तिचा वारसा त्यांच्यात जिवंत राहील. परिवारास सहानुभूती. मी भाग्यवान आहे, मला दादीला जवळून अनुभवता आलं.
Devastated by the news of Chandro Dadi’s demise. Feels like a part of me is gone. She made her own rules & paved the path for many girl to find their dream. Her legacy will live on in them. Condolences to the family. Am lucky I got to know and be her 🙏#ChandroTomar #ShooterDadi
— bhumi pednekar (@bhumipednekar) April 30, 2021