उदयनराजेंच्या शपथविधीच्या वादावर व्यंकय्या नायडू यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीच्या वेळी उदयनराजेंच्या जय भवानी जय शिवाजी या उद्घोषावर आक्षेप घेतल्यावरुन राज्यात तीव्र संतापाची लाट दिसून आली. अनेक ठिकाणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली.
मुंबई : राज्यसभा खासदारांनी काल (22 जुलै) शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सर्व खासदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली होती. 'तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या' असं व्यंकय्या नायडू म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्याच्या विरोधात मोठा वाद निर्माण झाला आहे. आता यावर राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीच्या वेळी उदयनराजेंच्या जय भवानी जय शिवाजी या उद्घोषावर आक्षेप घेतल्यावरुन राज्यात तीव्र संतापाची लाट दिसून आली. अनेक ठिकाणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली. परंतु, आता स्वतः व्यंकय्या नायडू यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि देवी भवानीचा उपासकही आहे. परंतु, सभागृहात शपथ घेताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या जात नाहीत, याचीच मी सभागृहाच्या सदस्यांना आठवण करून दिली. यातून कोणताच अनादर केला नाही', असं ट्वीट व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे.
शपथविधी वेळी नेमकं काय घडलं होतं?
राज्यसभा खासदारांनी काल (22 जुलै) शपथ घेतली. यावेळी भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी 'जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली. "तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या' असं व्यंकय्या नायडू म्हणाले.
भाजपचं तोंडबंद आंदोलन : संजय राऊतांचं ट्वीट
जय भवानी जय शिवाजी या घोषणेवरुन झालेल्या वादावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपचं तोंडबंद आंदोलन सुरु झाल्याचं संजय राऊत म्हणाले होते. ""छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही...जय भवानी! जय शिवाजी!," असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.
भाजप औरंगजेबासारखं राज्य चालवतेय : सचिन सावंत
तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही याचा निषेध केला होता. त्यांनी शिवरायांच्या आशीर्वादाचं नाव घेत सत्तेत आलेली भाजप औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. " छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो. शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे. जाहीर निषेध!, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं होतं.
पाहा व्हिडीओ : महापुरुषांच्या नावांवरून वादांची वादळं कशासाठी? राज्यसभेतील घोषणेवर आक्षेप कुणाचा? माझा विशेष
उदयनराजेंच्या शपथविधीच्या वादावरुन व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलनं
'जय श्रीराम'च्या पत्रांना 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेच्या पत्रांनी उत्तर
भारतीय जनता युवा मोर्चा अभियान राबवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेली दहा लाख पत्र पाठवणार आहे. आता भाजपुमोच्या या अभियानाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसही उत्तर देणार आहे. "जय भवानी जय शिवाजी" लिहून 20 लाख पोस्टकार्ड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' घोषणा दिली होती. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी समज दिली. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपराष्ट्रपतींना 20 लाख पत्र पाठवणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
शिवरायांचा अपमान झाला असता तर ऐकून घेतलं असतं का? तिथेच राजीनामा दिला असता : उदयनराजे