एक्स्प्लोर

पेन्शनसाठी आईचा मृतदेह चार महिने घरातच ठेवला!

महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला त्यावेळी हाताच्या अंगठ्यावर शाईचे डाग होते. यावरुन हे कुटुंब महिलेच्या मृतदेहाचा अंगठा लावून पेन्शन घेत होतं, हे स्पष्ट होतं.

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने पेन्शनसाठी चार महिन्यांपूर्वी निधन झालेल्या 70 वर्षीय आईवर अंत्यसंस्कार केले नाहीत. मुलांनी महिलेच्या मृतदेहावर केमिकल लावून ते सुरक्षित ठेवलं होतं, जेणेकरुन शरीर खराब होणार नाही आणि दुर्गंध पसरणार नाही. पोलिसांनी घरावर छापा मारुन ही घटना उघडकीस आणली. वाराणसीजवळच्या भेलुपूर इथल्या कबीरनगरमध्ये ही घटना घडली आहे. अमरावती नावाच्या या महिलेचं 13 जानेवारी 2018 रोजी निधन झालं होतं. 40 हजार रुपये पेन्शन अमरावतींचे पती दया प्रसाद यांचं निधन 2000 मध्ये झालं होतं. त्यानंतर अमरावतींना महिन्याला 40 हजार रुपये पेन्शन मिळत होती. या पेन्शनच्या लालसेपोटी महिलेच्या मुलांनी तिच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कार न करता, केमिकलच्या मदतीने मृतदेह सुरक्षित ठेवला आणि दर महिन्याला पेन्शन घेत होते. असा झाला उलगडा! बरेच दिवस महिला न दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. शिवाय आरोपी कुटुंब कोणालाही आपल्या घरी येऊ देत नव्हतं. त्यामुळे कोणीतरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी कुटुंबाच्या घरावर छापा मारला आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. सोबतच पोलिसांनी घरही सील करुन मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला त्यावेळी हाताच्या अंगठ्यावर शाईचे डाग होते. यावरुन हे कुटुंब महिलेच्या मृतदेहाचा अंगठा लावून पेन्शन घेत होतं, हे स्पष्ट होतं. बेरोजगार मुलं आईच्या पेन्शनवर अवलंबून मृत महिलेच्या कुटुंबात पाच मुलं आणि तीन मुली आहे. त्यापैकी दोन मुलांची आणि मुलींची लग्न झाली आहेत. पाचही मुलं बेरोजगार असून महिलेला मिळत असलेल्या पेन्शनवर जगत होते. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Embed widget