Video : पुढील 3 महिन्यात धावणार वंदे भारत स्लीपर; रेल्वेमंत्र्यांकडून पाहणी अन् तिकीटाबाबतही बोलले
देशात पहिली वंदे भारत ट्रेन मुंबई ते सोलापूर या मार्गावर महाराष्ट्रात धावली. त्यानंतर, वंदे भारत ट्रेनचा सुरू असलेला पल्ला वाढत असून देशभरात आता 102 वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
बंगळुरू : देशातील सर्वात हायस्पीड वंदे भारत ट्रेनने नुतकेच शतक पूर्ण केले असून प्रवाशांनाही या ट्रेनची भुरळ पडली आहे. देशातील लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद या ट्रेनला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार 31 ऑगस्ट रोजी देशातील आणखी 3 नवीन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे, देशातील वंदे भारत ट्रेनची संख्या आता शतकेपार गेली आहे. मोदींच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झालेल्या या नवीन तीन ट्रेन चेन्नई ते नागरकोइल, मदुराई ते बेंगळुरू आणि मेरठ ते लखनौ या मार्गावर धावणार आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी वंदे भारतसंदर्भात आणखी एक गुडन्यूज समोर आली आहे. बंगळुरू येथील वंदे भारत ट्रेन तयार होणाऱ्या कंपनीत वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी BEML येथे भेट देऊन स्लीपर वंदे भारतची पाहणी केली. यावेळी, पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईल, अशी घोषणा देखील त्यांनी केली.
देशात पहिली वंदे भारत ट्रेन (Vande Bharat) मुंबई ते सोलापूर या मार्गावर महाराष्ट्रात धावली. त्यानंतर, वंदे भारत ट्रेनचा सुरू असलेला पल्ला वाढत असून देशभरात आता 102 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. या गाड्यांमधून तब्बल 3 कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. वंदे भारत ट्रेन ह्या सर्वप्रथम 15 फेब्रुवारी 2019 रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या देशात 100 हून अधिक वंदे भारत धावत आहेत. वंदे भारत ट्रेनचे मार्ग देशातील 280 हून अधिक जिल्ह्यांना जोडत आहेत. आता, आनंदाची बाब म्हणजे वंदे भारत ट्रेनची स्लीपर आता लवकरच रेल्वे मार्गावर धावणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून कर्नाटकच्या बंगळुरू येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनची पाहणी केली. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) सुविधेमध्ये वंदे भारत स्लीपर कोचच्या प्रोटोटाइपचे अनावरण रेल्वेमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. वंदे भारत स्लीपर कोचच्या प्रोटोटाईपचे अनावरण केल्यानंतर, वैष्णव यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, पुढील मूल्यमापनासाठी ह्या स्लीपर कोच ट्रॅकवर ठेवण्यापूर्वी पुढील 10 दिवसांत या ट्रेनच्या सर्वोतोपरी चाचण्या घेण्यात येतील. विशेष म्हणजे पुढील तीन महिन्यांत ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रेल्वे रुळावर धावण्याची शक्यता आहे. कारण, रेल्वेमंत्र्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. पुढील तीन महिन्यांत वंदे भारत स्लीपर कोच रेल्वे रुळावर धावेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असून ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दिसेल, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.
#WATCH | Bengaluru, Karnataka | Railway Minister Ashwini Vaishnaw says, "A lot of things have been taken care of in this coach...Four trains, Vande Chair Car, Vande Sleeper, Vande Metro and Amrit Bharat have been designed in a way to address many things, like modern technology,… https://t.co/e8YI0nDmEW pic.twitter.com/dq2UwMxY0j
— ANI (@ANI) September 1, 2024
मॉडर्न टेक्नॉलॉजीसह वंदे भारत चेअर, वंदेभारत स्लीपर, वंदे मेट्रो आणि अमृत भारत या चारही ट्रेनमध्ये प्रवाशांची सुरक्षा, मॉडर्न टेक्नॉलॉजी, लोको पायलटसाठी फॅसिलिटी, सर्वच स्टाफ, फूड स्टाफ या सर्वांना विचारात घेऊन ह्या चारही नव्या ट्रेन सुरू होत आहेत. ही मध्यमवर्गींयांची सवारी असल्याने परवडणारे तिकीटदर असतील, असेही अश्विनी वैष्णव यांनी म्हटले. 800 ते 1200 किमी अंतरावरच या ट्रेन प्रथम धावतील, त्यामध्ये रात्रीचा प्रवास केल्यानंतर सकाळी तुम्ही इच्छितस्थळी पोहोचू शकाल. एसी, बर्थ सीटची सुरक्षा, डिझाईन आणि इतरही आरामदायी सुविधांवर भर देण्यात आला असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा