Vaccination For Children : येत्या दोन आठवड्यांमध्ये 12-18 वयोगटातील मुलांचं लसीकरण? 'या' लसीला मंजूरी मिळण्याची शक्यता
जायडस कॅडिलानं दावा केलाय की, त्यांच्या कंपनीचं वॅक्सिन 66.60 टक्के परिणामकारक आहे. तीन डोस वालं वॅक्सिन आहे. 4-4 आठवड्यांच्या अंतरानं दिली जाऊ शकते. लसीला 2-8 डिग्री तापमानावर स्टोअर केलं जाऊ शकतं.
![Vaccination For Children : येत्या दोन आठवड्यांमध्ये 12-18 वयोगटातील मुलांचं लसीकरण? 'या' लसीला मंजूरी मिळण्याची शक्यता Vaccination For Children zydus cadilla vaccine for children may get approval in two weeks which 67 percent effective Vaccination For Children : येत्या दोन आठवड्यांमध्ये 12-18 वयोगटातील मुलांचं लसीकरण? 'या' लसीला मंजूरी मिळण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/03/ff1e1bc7cb0e434d25db0268c0467ac0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vaccination For Children : भारतात दोन आठवड्यांत जायडस कॅडिलाच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. ही लस 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी 67 टक्क्यांपर्यंत परिणामकारक आहे. जायडस कॅडिलाची कोरोना लशीची 12 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांवर चाचणी झाली आहे. आता लवकरच या लसीला डीसीजीआय परवानगी मिळण्याची आशा आहे. ही माहिती नीति आयोगाच्या आरोग्य सदस्य डॉ. पॉल यांनी दिली आहे.
जायडस कॅडिलाची कोरोना लस जायकोव डी (Zycov D) ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. कॅडिलानं कोरोना लशीसाठी सीडीएससीओ म्हणजेच, सेंट्रल ड्रग स्टँण्डर्ड कंट्रोल आर्गेनायजेशनकडे आपातकालीन वापरासाठी मंजूरी मागितली आहे. कंपनीनं जवळपास 28 हजार लोकांवर चाचणी पूर्ण केल्यानंतर इमरजेंसी यूज ऑथरायजेशन म्हणजेच, आपातकालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. कंपनीच्या अर्जावर सीडीएससीओकडून डाटा अॅनालिसिस केलं जात आहे. कंपनीच्या वतीनं वॅक्सिन ट्रायलचा सर्व डाटा देण्यात आला आहे.
67 टक्क्यांपर्यंत परिणामकारक जायकोव-डी
जायडस कॅडिलानं काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, या लसीची 12 ते 18 वर्षांच्या जवळपास हजार मुलांवर ट्रायल करण्यात आली आणि ही लस सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे. याची एफिकेसी 66.60 टक्के आहे. तीन डोस असणारी ही लस 4-4 आठवड्यांच्या अंतरावर दिली जाऊ शकते. या लसीला 2-8 डिग्री तापमानावर स्टोअर केलं जाऊ शकतं. ही पहिली Plasmid डीएनए लस आहे. यामध्ये इंजेक्शनता वापर केला जात नाही, तर ही लस वॅक्सिन नीडल फ्री आहे. ही लस जेट इंजेक्टरमार्फत देण्यात येईल. कंपनीची योजना वार्षिक 10-12 कोटी लसीचे डोस तयार करण्याची आहे.
जायडस कॅडिया व्यतिरिक्त दुसऱ्या अनेक कंपन्याही लहान मुलांसाठी परिणामकारक लस तयार करण्यासाठी काम करत आहेत. भारत बायोटेकचं 2 ते 18 वर्षांच्या मुलांवरील ट्रायल जवळपास पूर्ण झालं आहे. कंपनी लवकरच चाचणी पूर्ण करुन अंतरिम डेटासह आपातकालीन यूज ऑथरायजेशनसाठी अर्ज करणार आहे. याव्यतिरिक्त नोवावॅक्ससाठीही लहान मुलांच्या ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे. अशातच बायो ईनं परवानगी मागितली आहे. आशा आहे की, लहान मुलांसाठीची लस लवकरच मिळू शकते.
सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता : डॉ. रणदीप गुलेरिया
देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. एक संकट दूर होत असताना आता तिसर्या लाटेच्या धोक्याबाबतही शक्यता वर्तवली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात दिसू शकते. यासह, काही तज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका होण्याची शक्यता आहे. या दरम्यान मुलांच्या लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, भारत बायोटेकच्या कोवाक्सिन लसीला मुलांच्या वापरासाठी सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. यासह ते म्हणाले की फिझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ती देखील मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)